छत्रपती शिवाजी महाराजांनी, पाहिलेले हिंदवी स्वराज्याच स्वप्न साकार करण्यासाठी प्रत्येक मावळ्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. आणि अशाच एका मावळ्याची, म्हणजेच तान्हाजी मालुसरे यांची शौर्यगाथा भव्यदिव्य रुपात मोठ्या पडद्यावर मांडण्यात आली आहे. ओम राऊत या मराठमोळ्या दिग्दर्शकाने तान्हाजी - द अनसंग वॉरिअर’ या चित्रपटाची मेजवानी आपल्या समोर सादर केली. आणि खूप कमी वेळातच या चित्रपटाने १५० कोटींचा टप्पा पार केला. याच सोबत महाराष्ट्रामधील सगळ्याच चित्रपट प्रेमींसाठी, एक आनंदाची बातमी अशी आहे कि, उत्तरप्रदेश आणि हरियाणानंतर आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा तान्हाजी - द अनसंग वॉरिअर’ हा चित्रपट करमुक्त केला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

        ओम राऊत याच दिग्दर्शन असलेल्या, तान्हाजी - द अनसंग वॉरिअर’ या चित्रपटामध्ये अजय देवगण सोबत शरद केळकर, देवदत्त नागे, शशांक शेंडे, अजिंक्य देव आणि कैलाश वाघमारे यांसारख्या मराठी कलाकारांचा सुद्धा मोलाचा वाटा आहे. तान्हाजी - द अनसंग वॉरिअर’ हा चित्रपट महाराष्ट्रामध्ये करमुक्त झाल्याने, या संदर्भात चित्रपटातील मुख्य भूमिकेतील अभिनेता अजय देवगणने ट्विट केले करत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले आहे. ‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त केल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार’ असे त्याने ट्विटमध्ये म्हटले आहे.


      तान्हाजी मालुसरे यांची शौर्यगाथा, पहिल्यांदाच आपल्याला एवढ्या मोठ्या पडद्यावर बघायला मिळत आहे. मराठी भाषिक प्रेक्षकांसोबतच इतर प्रेक्षक सुद्धा या चित्रपटाची वाह वा.. करत आहे. ओम राऊत याने, विएफएक्स, ऍक्शन सीन्स या सगळ्यांचा खूप चांगल्या पद्धतीने वापर केला आहे. आणि यामुळेच हा चित्रपट आपल्याला भव्यदिव्य पडद्यावर अजून चांगल्या पद्धतीने बघायला मिळत आहे. १० जानेवारी रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट, आज सुद्धा तेवढ्याच जोरात थिएटर मध्ये गाजत आहे. आणि तेवढ्याच जोरात कमाई सुद्धा करत आहे. आणि आता महाराष्ट्रामध्ये टॅक्स फ्री झाल्यानंतर लवकरच ‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर हा चित्रपट २०० करोडचा टप्पा पार करेल यामध्ये काही वाद नाही.