सध्या सगळ्या सोशल मीडियासाईट वर, फक्त आणि फक्त एकाच चित्रपटाची चर्चा होत आहे, आणि तो चित्रपट म्हणजे झुंड... दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि बॉलीवूड मधील Shahenshah अमिताभ बच्चन, यांची मुख्य भूमिका असलेला झुंड चित्रपटाचा टिझर नुकताच सोशल मीडियावर लाँच झाला आहे. आणि खूप कमी वेळातच या टिझरने Milion चा टप्पा पार करत, युट्युबच्या ट्रेंडिंग लिस्ट मध्ये आपल्या नावाची नोंद केली. दिग्दर्शक नागराज मंजुळेच्या झुंड या चित्रपटाच्या टिझरची सुरवात, अमिताभ बच्चन यांच्या भारदस्त आवाजाने होते. ( झुंड नही कहीये सर, टीम कहीये, टीम...)  या डायलॉग ने सुरवात होत आपण मुलांची टोळी बघतो. आणि या मुलांच्या टोळीला पाहून आपण समजून जातो कि, हा चित्रपट रस्त्यावर राहणाऱ्या मुलांवर आधारित आहे.
दिग्दर्शक नागराज मंजुळे, आणि हिंदी सिनेअभिनेते अमिताभ बच्चन यांच्या झुंड या चित्रपटाची शूटिंग गेल्या वर्षांपासून सुरु झाली होती. आणि आता आपल्याला या चित्रपटाचा आस्वाद घ्यायला मिळणार आहे.  आपल्याला या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन यांच्या सोबत, सैराटमधील जोडी आर्ची - परश्या म्हणजेच, रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर सुद्धा दिसणार आहेत. आणि त्याच सोबत आपल्याला यामध्ये अजय - अतुल या जोडीचं संगीत ऐकायला मिळणार आहे. झुंड या चित्रपटाची गोष्ट झोपडपट्टी मध्ये राहणारी मुलं आणि त्यांना घेऊन बनवली जाणारी पहिली स्लम फुटबॉल टीम या साऱ्यावर हा चित्रपट आधारित आहे. विजय बरसे यांनी, हि पहिली स्लम फुटबॉल टीम बनवली, आणि यांची भूमिका अमिताभ बच्चन या चित्रपटामध्ये साकारणार आहे. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंट , झुंड .. आ गया !, Jhund nahi, team kahiye!  असं दमदार caption देत ( झुंड ) या चित्रपटाचा टिझर शेअर केला आहे. खूप कमी वेळातच हा टिझर प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे.


अमिताभ बच्चन यांचा कसदार अभिनय, भारदस्त आवाज आणि नागराज मंजुळे यांची दिग्दर्शकीय नजर या साऱ्यामधून तयार झालेला झुंड हा चित्रपट येत्या ८ मे २०२०, ला आपल्या भेटीला येत आहे. आता हि अभिनेता - दिग्दर्शकाची जोडी काय कमाल करेल हे पाहणे खूपच रंजक असणार आहे.