नावापासूनच वेगळेपण जपलेल्या तत्ताड या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आलं. अतिशय रंगीबेरंगी आणि लक्षवेधी असं हे पोस्टर असून, प्रेक्षकांचं पुरेपुर मनोरंजन हा चित्रपट करेल याची खात्री या पोस्टरमुळे मिळते.

वेब स्ट्रीमिंगमध्ये आघाडीवर असलेल्या प्राइमफ्लिक्सनं हा चित्रपट प्रस्तुत केला आहे. चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन राहुल गौतम ओव्हाळ यांनी केलं आहे. राकेश भोसले आणि प्रितम म्हेत्रे चित्रपटाचे निर्माते आहेत. लग्नातल्या बँडमध्ये पिपाणी वाजवणाऱ्या एका तरुणाची गोष्ट या चित्रपटातून मांडण्यात आली आहे. 

चित्रपटात चेतन डीके, मानसी पाठक, ज्योती सुभाष, अनिल नगरकर, राहुल बेलापूरकर, सागर पवार, प्रफुल्लकुमार कांबळे, अक्षदा काटकर, सुदर्शन काळे, रोहित जाधव, राजेश मोरे, शरद ढिकुले, स्वप्नील धोंगडे, प्रसाद ओझरकर, गिरीजा झाड अशी उत्तम स्टारकास्ट आहे. २१ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे