पहिल्या आवृत्तीसाठी प्रचंड प्रमाणात प्रेम मिळाल्यानंतर, क्रिटिक्स चॉइस अवॉर्ड्स 2019 हे त्यांच्या  दुसर्‍या आवृत्तीसह परत आले. यावेळी,पुरस्कारांमध्ये मुख्य भर वेब सीरिजची करण्यात आली आहे, कारण पॅनेलने त्यांच्या श्रेणींमध्ये ओटीटी जोडण्याचा निर्णय घेतला आहे ज्यामुळे केवळ अधिक दर्जेदार कलाकृती प्रकाशझोतात येतील. 

द फॅमिली मॅन, मिर्झापूर, दिल्ली क्राइम, सेक्रेड गेम्स इत्यादी वेबसिरीजला  या वर्षी नामांकन मिळाली आहेत. तसेच हिंदी, कन्नड, बंगाली आणि मराठी भाषेच्या वेबसिरीज ला देखील नामांकन मिळाली आहेत,तसेच  नसीरुद्दीन शाह आणि कबीर साजिद ह्या दोन प्रतिभावंत अभिनेत्यांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी देखील नामांकन मिळाली आहेत. 

फिल्म क्रिटिक्स गिल्ड नामांकित समीक्षकांचे पॅनेल आहे ज्यांनी  क्रिटिक्स चॉइस अवॉर्ड्सची कोर कमिटी स्थापित केली . डिसेंबर 2018 मध्ये त्याची स्थापना झाल्यापासून, समीक्षकांना ’चॉइस अवॉर्ड्स’ मधील विजयी कलाकारांना पुरस्कृत करण्यासाठी, त्यांच्या कलाकुसरसाठी आणि कलाप्रकारात त्यांच्या योगदानासाठी भरपूर मान्यता मिळाली. 

गेल्या वर्षी, फिल्म क्रिटिक्स ’गिल्ड अँड मोशन कंटेंट ग्रुप’ने व्हिस्टा मीडिया कॅपिटलच्या सहकार्याने एक अशा प्रकारच्या क्रिटिक्स’ चॉईस शॉर्ट फिल्म अवॉर्ड्सची घोषणा केली ज्यात भारताच्या सर्वोच्च चित्रपट समीक्षकांचा समावेश असलेले एक पॅनेल आहे.

सर्व नामांकित कलाकारांना खूप शुभेच्छा आणि आम्हाला खात्री आहे की पहिल्या आवृत्तीप्रमाणेच हे देखील एक मोठे यश ठरेल.