गतवर्षी पार पाडलेल्या Itsmajja डिजिटल अवॉर्ड्सला तुम्ही प्रेक्षकांनी भरपूर चांगला प्रतिसाद दिला.  म्हणूनच या वर्षीसुद्धा आम्ही तुमच्या साठी 2nd Majja Digital Awards घेऊन आले आहोत. नुकताच या अवॉर्ड्सचा finale सुद्धा खूप जोरदार आणि चांगल्या पद्धतीने पार पडला. ज्यामध्ये पर्वणी लागली ती, दोन उत्तम आणि सदाबहार आरजें ची म्हणजेच आपल्या सगळ्यांचे लाडके RJ Shonali आणि RJ Bandya या दोन सदाबहार आरजेंनी मिश्किल आणि मजेशीररित्या आपल्या अवॉर्ड्स च्या Finale चे सूत्रसंचालन केले. संस्कृतीचं माहेर घर मानलं जाणाऱ्या पुणेमधील Waari Book Cafe आणि Dhonewada Restaurant या ठिकाणी हा अवॉर्ड्स सोहळा पार पडला.

यावर्षी सुद्धा तुम्ही प्रेक्षकांसोबत, मराठी कलाकारांनी सुद्धा या अवॉर्ड्सला खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिला. ज्यामध्ये तुम्ही प्रेक्षकांनी केलेले वोट हे खूप मोलाचं असं ठरलं. आणि या अवॉर्ड्सचे मानकरी ठरलेल्या प्रत्येक मराठी कलाकारांनी त्यांच्या सोशल मीडिया साईटवर itsmajja ची दिमाखदार ट्रॉफी सोबत फोटो पोस्ट करत आमचे कौतुक सुद्धा केले. Itsmajja नेहमीच तुम्हा प्रेक्षकांसाठी काही तरी नवीन करण्याच्या धडपडीत असतो, आणि हा अवॉर्ड्स सोहळा सुद्धा त्यामधील एक भाग आहे. आणि यामध्ये आम्हाला मराठी कलाकारांची सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने साथ मिळाली आहे. 

ज्यामध्ये  Majjedaar Kalakaar of the year (Male) म्हणून स्वप्नील जोशीने बाजी मारली तर,  


Outstanding Actor in A Lead Role (male) म्हणून सुबोध भावे याच नाव आमच्या ट्रॉफी वर कोरल गेलं. 


अशाच अनेक मराठी कलाकारांच्या कलागुणांचा कौतुक करत itsmajja नेहमीच त्यांना प्रोत्साहन देत आहे.

 itsmajja  नेहमीच तुम्हा प्रेक्षकांच्या करमणुकीसाठी काही तरी वेगळं आणि नवीन देण्याच्या प्रयत्नामध्ये असतो. आणि  2nd Majja Digital Awards हा सुद्धा त्यामधील एक भाग आहे. आणि हा सोहळा मराठी कलाकार आणि तुम्ही प्रेक्षकवर्ग यांच्या प्रतिसादामुळे आणि प्रेमामुळेच दरवर्षी असाच तुमच्या पुढे सादर होत राहील. यामध्ये काही शंका नाही !