१. एक दिग्दर्शक म्हणून तुम्ही या करार प्रेमाचा चित्रपटाकडे कस बघता ? आणि तुम्ही हा विषय निवडायचा निर्णय का घेतला ?
   याआधी पासून मला एक मराठी चित्रपट करायचा होताच, पण मला पाहिजे तशी स्टोरी मिळत न्हवती. आणि मला तरी प्रेक्षकांना काही तरी वेगळं द्यावं असं वाटत होत. आणि असं सगळं सुरु असताना मला या स्टोरीचा विचार आला, कारण मी खूप जवळून अशा काही गोष्टी बघितल्या आहेत. आणि हा विषय खूपच जवळ असा आहे  म्हणूच या विषयावर चित्रपट करावा असं मला वाटलं.

२. याआधी तुम्ही बॉलीवूड मध्ये काम केलं आहे, आणि आता दिग्दर्शक म्हणून तुमचा पहिला मराठी चित्रपट येत आहे, तर तुम्हाला मराठी आणि हिंदी चित्रपटश्रुष्टी मध्ये कोणता फरक आणि काय साम्य दिसून येत ?
   मला तर असं वाटतंय कि, या आधी बॉलीवूड मध्ये खूप चांगल्या कन्टेन्ट वर चित्रपट बनायचे. पण आता तसे राहिलेले नाही, आता जर तुम्ही बॉलीवूड चित्रपट बघितला तर त्यामध्ये कन्टेन्ट कुठे तरी हरवल्या सारखा दिसून येतो. पण मराठी मध्ये तसे नाही आहे. मराठी चित्रपटांमध्ये सगळ्यात जास्त महत्व हे कन्टेन्ट ला दिल जात. मग त्या चित्रपटाचं बजेट जरी कमी असलं तरी चालेल पण, कन्टेन्ट महत्वाचा आहे आणि हीच गोष्ट मराठी चित्रपटांमध्ये खूप चांगल्या पद्धतीने दिसून येते.

३. या चित्रपटामध्ये तुमच्या सोबत अनिकेत विश्वासराव आणि नेहा महाजन यांनी काम केलं आहे, तुमचा अनुभव कसा होता या दोन कलाकारानं सोबत काम करायचा ?
   खरंच खूप चांगला अनुभव होता, कारण दोघेही मराठी मधील खूप चांगले कलाकार आहेत. आणि  ते कामाला घेऊन किती एकनिष्ठ आहेत त्यांच्या कामामधून मला दिसून सुद्धा आलं. मी तर पहिल्यांदा त्यांच्या सोबत काम केलं आहे, पण तरीसुद्धा त्यांनी मला कधी दाखवून दिल नाही कि, तुम्ही या इंडस्ट्री मध्ये नवीन आहात वगरे,ऑन सेट आमची खूप मज्जा मस्ती चालायची, पण जेव्हा शूट सुरु व्हायचं तेव्हा मात्र दोघेही आपल्या कामाला खूप चांगल्या पद्धतीने न्याय द्यायचे. आणि त्यांना माहित असायचं कि, दिग्दर्शकाला काय आपल्याकडून काय पाहिजे ? आणि कशा पद्धतीने पाहिजे आणि तसंच काम मला त्याच्या कडून मिळालं सुद्धा, आणि असाच आदर मला दोघांकडून मिळाला.

४. नवरा - बायकोच्या नात्यावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. तुम्ही काय सांगाल हा चित्रपट कसा वेगळा आहे ईतर चित्रपटांपेक्षा, आणि काय वेगळं आम्हाला बघायला मिळणार आहे ?
    एक नवरा बायको यांचं नातं कस असलं पाहजे, आणि त्या नात्यामध्ये मर्म कसा असला पाहिजे या सगळ्या गोष्टीवर आधारित हा चित्रपट आहे. सगळं काही चांगलं सुरु असताना जेव्हा या दोघांमध्ये मतभेद होतात, त्यामुळे होणारे वादविवाद आणि या सगळ्या मध्ये रखडले जाणारे त्यांचं नातं आणि या सगळ्याचा शेवट कसा होतो हे सार काही तुम्हाला बघायला मिळणार आहे.

५. दिग्दर्शक म्हणून तुमचा हा पहिला मराठी चित्रपट आहे. याआधी बॉलीवूड दिग्दर्शक म्हणून काम केल  आहे, काय सांगाल या प्रवासाबद्दल ?
    खरंच माझ्यासाठी हा खूप चांगला अनुभव होता, कारण याआधी मी फक्त विचार करायचो कि आपण एखादा तरी मराठी चित्रपट करूया, आणि आता माझा पहिला मराठी चित्रपट बनून तयार आहे. तर याचा खरंच खूप आनंद होत आहे. हिंदी चित्रपटाचं बजेट जरी मोठं असलं तरी तुम्हाला काही ठिकाणी तुम्हाला पाहिजे तसं वागता येत नाही किंवा पाहिजे तसं काम करता येत नाही. पण मराठी चित्रपटांचं तसं नाही आहे, मराठी चित्रपटाचं बजेट मोठं असलं तरी सुद्धा, एक दिग्दर्शक म्हणून आपल्याला जे पाहिजे ते करायची मुभा मिळते.

नवरा बायको यांच्या नात्यावर भाष्य करणारा आणि त्यांच्या दोघांमधील नात्यातील ऋणानुंबंध जपणारा करार प्रेमाचा हा चित्रपट लवकर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.