कुसुम नाव काय वाईट आहे ? शेवटी नावात काय आहे ? असं म्हणत नवद्दिचा काळ गाजवलेलं नाटक म्हणजेच कुसुम मनोहर लेले. विनय आपटे दिग्दर्शित, डॉ. गिरीश कुलकर्णी, सुकन्या मोने आणि संजय मोने यांची मुख्य भूमिका असलेलं हे नाटक पुन्हा एकदा नव्या दमात आणि नव्या कलाकारांसोबत रंगभूमी वर पदार्पण करत आहे. सध्या मराठी रंगभूमी वर जुन्या नाटकांना, पुनर्जीवित करत त्यामधील मूळ गाभा तसाच राखत फक्त नवीन आणि तेवढेच दमदार कलाकार घेऊन प्रेक्षकांसाठी एक सुंदर मेजवानी तयार करायचं काम, सध्याचे दिग्दर्शक करत आहे. मग त्यामध्ये हिमालयाची सावली, निम्मा शिम्मा राक्षस, अश्रूंची झाली फुले या नाटकांचा समावेश आहे. आणि या साऱ्या मध्ये अजून एक नवीन नाटक आपल्याला बघायला मिळणार आहे.

प्रदीप मुळ्ये दिग्दर्शित 'कुसुम मनोहर लेले' हे नवद्दिच्या दशकातलं नाटक पुन्हा एकदा आपल्या समोर घेऊन येत आहे. आणि या बाबतची बातमी नाटकात मुख्य कलाकार म्हणून काम करणाऱ्या शशांक केतकर याने आपल्या इंस्टाग्राम आणि फेसबुक या अकॉउंट वर शेअर केली आहे. शशांक सोबत आपल्याला या नाटकामध्ये पल्लवी पाटील आणि संग्राम समेळ हे चेहेरे दिसणार आहेत.  सुजाता देशमुख ह्या एका घटस्पोटित महिलेला मनोहर लेले नावाचा इसम खोटे लग्नाचे आश्वासन देऊन फसवतो आणि तिचे मूल पळवतो. या सत्य घटनेवर आधारित हे नाटक पुन्हा एकदा आपल्या समोर येणार आहे. मनोहर लेले या बंडखोर आणि पाताळयंत्री इसमाची भूमिका शशांक केतकर निभावणार असून, सुजाता देशमुखची भूमिका पल्लवी पाटील पार पाडणार असून या नाटकाला संगीत अशोक पत्की यांनी दिल आहे.

सुकन्या मोने आणि संजय मोने यांनी गाजवलेलं हे नाटक पुन्हा एकदा नव्या दमात मराठी रंगभूमीवर येत आहे. आणि या नाटकाचा पहिला अंक गडकरी रंगायतन ठाणे इथे होणार असून शशांक केतकर आपल्या समोर एका नवीन भूमिकेतून येणार आहे. आणि शशांक हि भूमिका कशा पद्धतीने साकारेल हे पाहण्यात खरी रंगत आहे.