आपल्या अभिनयाने परिपूर्ण आणि सौंदर्याने साऱ्या प्रेक्षकांना भुरळ पडणारी अभिनेत्री म्हणजेच तेजस्विनी पंडित ! तेजस्विनी नेहमीच तिच्या अभिनय कौशल्याने सगळ्या प्रेक्षकांचे मनोरंजन तर करतेच पण त्यासोबत नेहमी काही तरी नवीन करण्याचा प्रयत्न सुद्धा करते, आणि त्यामध्ये ती यशस्वी सुद्धा होते. मग त्यामध्ये तिने केलेल्या वेगवेगळ्या तर्हेच्या चित्रपटांची नांदी असो किंवा या  चित्रपटांसाठी तेजस्विनी ने सतत बदलेल तिचे लूक्स ! ज्यामध्ये आवर्जून आपण नाव घेऊ शकतो ते म्हणजे, सिंधुताई सकपाळ यांची भूमिका आणि त्या भूमिके साठी तिने घेतलेली मेहनत, या साऱ्या गोष्टीमधुन तेजस्विनी स्वतःला सिद्ध करत पुढे जात आहे.

      असंच काही नवीन करण्याच्या धडपडीमध्ये तेजस्विनी ने तिचा आणि अभिज्ञा भावे सोबत मिळून नवीन क्लोथिंग ब्रँड 'तेजाज्ञा' सुरु केला आणि नेहमी प्रमाणे तेजस्विनीचा हा प्रयत्न सुद्धा तिच्या चाहत्यांच्या मनाला भावला आणि खूप चांगला प्रतिसाद सुद्धा मिळाला. आपलं काम फक्त अभिनयापुरत मर्यादित न ठेवता, ते अजून कोणत्या पद्धतीने सगळ्या पर्यंत पोहचवता येईल हा विचार नेहमीच तेजस्विनी करत असते. आणि असाच विचार करत तेजस्विनीने सध्या खास नवरात्रीसाठी खूपच वेगळे असे फोटो तिने तिच्या, इंस्टाग्राम अकाउंट वर शेअर केले आहेत. ज्यामध्ये आपण नवशक्तींची प्रतिमा पाहू शकतो. 

गेल्या वर्षी सुद्धा तेजस्विनीने अशाच नवशक्तींच्या प्रतिमांचे काही फोटो तिच्या अकाउंट वर शेअर केले आहेत. ज्यांना खूप चांगल्या पद्धतीने प्रेक्षकांकडून प्रतिसाद मिळाला, आणि म्हणूनच यावर्षी सुद्धा असच काहीस वेगळं करत नऊ शक्तिपिठी आणि त्यांची संरक्षण करणाऱ्या देवींची प्रतिमा साकारली आहे. पण यावेळी फक्त प्रतिमा साकारण्या परीज, त्यामधून समाजाला एक चपराक बसेल आणि काही बोध मिळेल यासाठी केलेला हा प्रयत्न सुद्धा खरंच सार्थकी लागला आहे.

        तेजस्विनी आपल्याला नेहमीच तिच्या कामांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन तर करत राहीलच पण त्याच सोबत आपण सुद्धा समाजाचे काही देणं लागतो याची जाणीव करत आपल्या परीने काही नवीन देण्याचा प्रयत्न करत असते.