एक दिग्दर्शक म्हणून तुम्हाला VFX आणि एडिटिंग या बद्दलची चांगली माहिती असावी कारण याच गोष्टीमुळे तुमचा चित्रपट चांगला बनू आणि दिसू शकतो. - कैलाश पवार  


१.  कैलाश या आधी तू VFX आर्टिस्ट म्हणून काम केलं आहेस, आणि आता एक दिग्दर्शक म्हणून आमच्या समोर येतोय काय सांगशील या प्रवासाबद्दल ? 
  मी VFX आर्टिस्ट सोबत एडिटर म्हणून पण काम केलं आहे, आणि याच गोष्टीचा मला दिग्दर्शनामध्ये सुद्धा फायदा झाला असं मी बोलू शकतो. कारण Visually एका VFX आर्टिस्ट ला काय पाहिजे त्या पद्धतीने मी शूट केलं आहे. आणि मला तर असं वाटत कि याची कल्पना सगळ्या दिग्दर्शकांना असावी, कारण जर एक दिग्दर्शक म्हणून एडिट कशा पद्धतीने झालं पाहिजे, आणि Visually तुमचं शूट कस दिसेल याची समज असेल, तर नक्कीच तुमचं पुढचं काम सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने होत.

२. या चित्रपटाचा विषय खूप नाजूक जरी असला तरी त्याच महत्व खूप आहे, जेव्हा या चित्रपटाची स्टोरी तुझ्या जवळ आली तेव्हा तुमच्या डोक्यात काय विचार आला?
  तस बघायला गेलं तर हा विषय खूप साधा आहे. कारण अशा मुलांकडे कोणी लक्ष देत नाही. सगळेच जण म्हणतात कि या मुलांसाठी अनाथआश्रम आहे. पण त्यांना कोणी अनाथाश्रम पर्यंत पोहचवत नाही. कारण सगळ्यांचं असं होत कि, ठीक आहे ना हि मुलं तर भिकारी आहेत तर त्यांना तसंच राहू दे ! पण जर यांपैकी कोणत्या मुलानी विचार केला कि, मला यामधून बाहेर निघून शिकून काही तरी करायचं आहे. आणि जर असं केलं तर, कोणी ना कोणी मला मदत करेलच हे सगळं बघण्यामध्ये खरी मज्जा आहे, असं मला वाटतंय. असा हा विषय मी खूप मजेशीर रित्या मांडला आहे.

३. या चित्रपटात तुझ्यासोबत अजून तीन बालकलाकारांनी काम केलं आहे, तुझा अनुभव कसा होता त्याच्या सोबत काम करताना?
    पहिली गोष्ट मी तरी त्यांना बालकलाकार बोलू शकत नाही, कारण ते आधी पासूनच खूप चांगल काम करत आले आहे. आपण साऱ्यांनीच याआधी त्यांचं काम बघितलं आहे. म्हणून त्यांना आधी पासून माहित होत कि, मला त्यांच्या कडून काय पाहिजे ? मी जरी एखादा सिन त्यांना सांगितला तर ते सहज करायचे, आणि मला पाहिजे तसे अपेक्षित सीन्स सुद्धा त्यांच्याकडून मिळायचे. आणि त्यांच्या बद्दल सांगायची गोष्ट तर, त्यांना आता पासूनच कॅमेरा आणि शूटिंग काय असते यासाऱ्या गोष्टीची जाण आहे. क्लोज - अप शॉट असुदे, किंवा वाईड अँगल, या सगळ्याबद्दल त्यांना माहिती होती म्हणून मला जास्त काही त्यांना ओरडून किंवा जबरदस्तीने काम करून घ्यावं लागलं नाही.  

४.  मराठी चित्रपटाचं बदलत स्वरूप आणि मराठी चित्रपटांनसमोर येणाऱ्या समस्या यावर तुझं मत काय आहे?
   समस्या तर आहेत पण माझं असं मत आहे कि, जर एक दिग्दर्शक, एक निर्माता म्हणून तुम्ही चांगला चित्रपट बनवला तर, तुम्हाला कोणी अडवू शकत नाही. चित्रपट बनवायचा होता म्हणून तुम्ही बनवला, तर सहाजिकच आहे समोरून कोणत्या हि थिएटर चा मालक तुम्हाला त्याच थिएटर देणार नाही. कारण काहिही झालं तरी त्याचा सुद्धा धंदा आहे. म्हणून या सगळ्या गोष्टीं साठी  एक चांगला चित्रपट बनवणं तेवढंच महत्वाचं आहे.

५. 'सलमान सोसायटी' नंतर दिग्दर्शक म्हणून तुझे पुढचे काय प्लॅन आहेत.? आणि तू काय सांगशील प्रेक्षकांना का चित्रपट पाहावा आणि आम्हाला काय वेगळं यामध्ये बघायला मिळेल?
    मी यानंतर अजून एक मराठी चित्रपट करतोय. सलमान सोसायटी नंतर लगेच त्याच काम सुरु होईल. आणि हा चित्रपट कमर्शिअल पातळी वर मोठा आहे. आणि त्यानंतर एक हिंदी चित्रपट करतोय. सध्या तरी माझं सगळं लक्ष सलमान सोसायटी वरच आहे. राहिला प्रश्न प्रेक्षकांनी हा चित्रपट का पाहावा तर, एक साधा विषय आहे, पण त्यामागचं त्याच गांभीर्य खूप मोठं आहे. आणि असाच एक विषय तुमच्यासमोर मजेशीर रित्या मांडत आहे. कारण आपल्या सगळ्यांमध्ये एक असा व्यक्ती असतो, जो कधीच विचार करत नाही जे काही होईल ते होईल, असं म्हणत आपलं काम करत असतो, अशाच पद्धतीची जर्नी तुम्हाला या चित्रपटामध्ये बघायला मिळणार आहे.

एका सामाजिक विषयाला हात घालत, आपल्या सगळ्यांचं हसत खेळत मनोरंजन करणारा 'सलमान सोसायटी' हा चित्रपट लवकरच आपल्या भेटीला येत आहे.