सध्या मराठी चित्रपटश्रुष्टीमध्ये, नवनवीन चित्रपटांची नांदीयाळी आपल्याला बघायला मिळते. आणि यामध्येच एक तरुण दिग्दर्शक आपल्यासाठी एक नवा कोरा चित्रपट "साथ तुझा भेटला" हा आपल्या भेटीला घेऊन येत आहे. २७ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार हा चित्रपट सध्याच्या युगातील प्रेमयुगलांवर आधिरीत असा आहे, आणि याच दरम्यान चित्रपटाचे दिग्दर्शक अंकुश प्रशांत मोरे यांच्या सोबत केलेली खास बातचीत  : 

१. तुमच्या करियरच्या सुरवातीलाच दिग्दर्शन, हे क्षेत्र का निवडवास वाटलं ? आणि याआधी दिग्दर्शक म्हणून काम केलं आहे का ?

 दिग्दर्शन यासाठी कारण ! आपल्याला यामध्ये खूप काही करायला मिळत आणि खूप अनुभवयाला सुद्धा, कारण एका दिग्दर्शकाचा गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा वेगळा असतो. आपण दिग्दर्शक म्हणून काम करताना, आपल्या सोबत काम करणाऱ्या कलाकारांकडून आपल्याला जे पाहिजे ते काढून घेऊ शकतो. आणि हो याआधी मी मराठी आणि भोजपुरी चित्रपटांमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं आहे. त्याच सोबत अनेक नाटकनासाठी सुद्धा दिग्दर्शकाची भूमिका बजावली आहे.

२. दिग्दर्शक म्हणून तुम्हाला हा विषय निवडावासा का वाटलं ? आणि याच स्क्रिप्ट ची निवड का केली ?

याआधी मी एका चित्रपटाला सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होतो, आणि त्याच चित्रपटाच्या लेखकांनी मला या चित्रपटाची ऑफर दिली. आणि साथ तुझा भेटला हा चित्रपट सुद्धा त्याच्या लेखणीमधून माझ्या कडे आला. हा विषय निवडण्याचं महत्वाचं कारण म्हणजे, हा चित्रपट आताची तरुण पिढी आणि त्याचं प्रेम यावर आधारित असा आहे. आणि म्हणूनच मला या चित्रपटाचा विषय माझ्या जवळचा वाटलं आणि या चित्रपटाचं दिग्दर्शन करण्याचा निर्णय घेतला.

३. या चित्रपटामध्ये तर आम्हाला संजय खापरे सर, दिसत आहे त्यांच्यासोबत अजून कोण कोण आम्हाला दिसून येणार आहे.

होय ! या चित्रपटामध्ये संजय खापरे सरांसारख्या एका अनुभवी आणि जेष्ठ अभिनेत्याची साथ आम्हाला मिळाली आहे. आणि त्याच्याच जोडीला या चित्रपटामध्ये तुम्हाला योगिता चव्हाण, चंद्रशेखर बन, पूर्वेश बारापात्रे, नेहा पाचोळे आणि प्रणाली राऊत हे कलाकार दिसणार आहे. यामध्ये एक बाब तुम्हाला दिसून येणार आहे ती म्हणजे, या चित्रपटामधील  मुख्य दोन कलाकार हे थिएटर आर्टिस्ट आहे. आणि या चित्रपटशृष्टीसाठी सुद्धा नवीन चेहेरे आहेत. ज्यांच्या सोबत मी सुद्धा नाटकांमध्ये काम केले आहे.

४. चित्रपटाच्या संगीता बद्दल काय सांगाल ? कोणत्या लयीची गाणी आम्हाला ऐकायला मिळणार आहे ?

हा याचित्रपट संपूर्णरित्या प्रेमावर आधारित असल्यामुळे, यामधील गाणी सुद्धा तशीच आहे. मोरेश्वर निस्तान हे आमच्या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक आहेत, आणि त्यांनी ३ रोमँटिक आणि १ बर्थडे सॉंग दिग्दर्शित केलं आहे. आणि मला तर असं वाटतंय  कि, एखाद्या मराठी चित्रपटामध्ये पहिल्यांदाच बर्थडे सॉंग चा समावेश असेल. आणि त्याचं सोबत गायक स्वप्नील बांदोडकर आणि गायिका प्रभू अरोरा यांनी गाणी गायली आहेत.

५. अंकुश सर आज आपल्या इथे मराठी चित्रपटाला खूप कमी स्क्रीन मिळत आहे, म्हणजे चित्रपट मोठा जरी असला तरी त्याला स्क्रीनसाठी झगडावं लागतं  काय सांगाल या बद्दल ?

होय खरंच हि खूप खंतेची बाब आहे कि, आज मराठी चित्रपटाला स्क्रीन मिळत नाही आहे. आमचा चित्रपट सुद्धा येत्या २७ सप्टेंबर ला रिलीज होणार आहे, पण याआधी हा चित्रपट २ ऑक्टोबरला रिलीज होणार होता, पण वॉर या हिंदी चित्रपटामुळे आम्हाला सुद्धा थिएटर मिळत नाही आहे आणि थिएटर मध्ये गेलो तरी, बाकीच्या सगळ्या चित्रपटांना प्राधान्य मिळते. यामध्ये आपली सुद्धा कुठे ना कुठे चूक आहे. आणि तस बघायला गेलं तर, सिनेमा गृहाला सुद्धा ज्या चित्रपटाकढून फायदा होणार त्याचं चित्रपटाची वर्णी लागते.

६. २७ सप्टेंबरला चित्रपट रिलीज होतोय , यानंतरचे तुमचे काय प्लॅन आहे ?

होय नक्कीच, २७ सप्टेंबर नंतर मी एक वेब सिरीज शूट करणार आहे. सध्या प्रोमोशन आणि रिलीज मध्ये व्यस्त असल्यामुळे, वेब सिरीज वर लक्ष देता आलं नाही, पण हो लवकरच या सिरीजच  सुद्धा शूट सुरु होणार आहे. आणि त्याच्या नंतर अजून नवीन मराठी चित्रपट घेऊन येतोय. माझं काही चुकलं का ? त्याचं शूट सुद्धा हिवाळ्यापासून म्हणजे इयर एंडिंगपासून सुरु होणार आहे. 


सध्याच्या युगातील प्रेमीयुगलांवर आधारित मराठी चित्रपट येत्या २७ सप्टेंबर रोजी आपल्या नजीकच्या चित्रपटगृहात आपल्याला पाहायला मिळणार आहे.