आपल्या दैनंदिन जीवनातील प्लास्टिकजन्य वस्तू पासून वन्यजीव व जलजीव धोक्यात येत आहे. अशा बातम्या सध्या वर्तमानपत्रात नियमित वाचयला मिळतात. आपण वापरात असलेल्या गोष्टीचा आपल्याला फायदा होत असला तरी, निसर्गाला आणि निसर्गातील इतर घटकांवर त्याचा वाईट परिणाम होत आहे. 

घरामध्ये गणरायाचे आगमन होणार म्हणजे घरातील प्रत्येक जण अतिशय उत्साही असतो. प्रत्येक जण आपल्या कल्पनाशक्तीला चालना देऊन आपला गणपती कसा सुंदर दिसेल यावर काम करत असतो. या सर्व गोष्टीमध्ये देवाप्रती असणारी  आस्ता, भक्ती हे सर्व बाजूला राहून आपल्या गणपतीचा देखावा इतर गणपतीपेक्षा सुंदर असणे या गोष्टी जास्त महत्वाच्या झाल्या आहेत. हे सर्व करत असताना आपण निसर्गामध्ये होणारे प्रदूषण या गोष्टीकडे मात्र कानाडोळा करतो.

असे असताना अनेक पर्यावरण प्रेमी आपल्या आजूबाजूला पाहायला मिळतात. असाच एक अवलिया म्हणजे नानासाहेब शेंडकर होय. १७ वर्षापूर्वी २ एकरांत पसरलेला नफ्यामध्ये असणारा थर्माकोलचा मखर कारखाना त्यांनी बंद केला. पण गणरायची सेवा करण्याचा ध्यास त्यांना स्वस्त बसून देत नव्हता म्हणूनच त्यांनी  उत्सवी.नेट या संस्थेची स्थापना केली . आणि त्या अंतर्गत संपूर्ण संशोधन करून पर्यावरण अनुकूल मखर गणेश भक्तांसाठी उपलब्ध करून दिले.

“विटभट्टी चालविणारे ठेकेदार पोकलंडच्या सहाय्याने जेव्हा मातीसाठी मोठ्या प्रमाणत उपसा करतात, तर ते ४ ते ५ फुट थरातून फक्त मातीचा गाळ उचलतात आणि कचरा पुन्हा तळ्यात मागे ढकलतात. ज्यामुळे निदान ४ इंच निव्वळ कचरा जमा होतो. हे प्रमाण लक्षात घेतले तर ३० ते ४० वर्षांनी नव्हे तर काही  वर्षातच या सर्व जलस्त्रोतांचे कचऱ्याचे उकिरडे होतील आणि पाणी नावापुरते याच कचर्यातून मार्ग काढून वाहत असतील.” असे अनुमान उत्सवी.नेटचे संस्थापक नानासाहेब शेंडकर यांनी मांडले आहे.

नानासाहेब शेंडकर यांनी सुरु केलेले घरगुती मखरांचे संशोधन सार्वजनिक मखरांपर्यंत पोहचले आहे. उत्सवी.नेट ही संस्था आता सार्वजनिक मंडपांसाठी मखर देखील तयार करते. उत्सावीने तयार केलेले मखरे हे कागदी पुठ्यांपासून बनलेली, हाताळायला सोपी, पर्यावरणपूरक आणि दीर्घकाळ वापरता येण्याजोगी आहेत. या मखरांची डिझाईन हे भारतीय कला आणि संस्कृती पासूनच प्रेरित आहे. 

नानासाहेब शेंडकर यांच्या उत्सवी.नेट मखरांना महाराष्ट्रातूनच नाही तर संपूर्ण जगभरातून आवर्जुन मागणी आहे. या वर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे शिवकालीन गड-किल्ल्यांच्या प्रतिकांचा वापर करुन तयार केलेले मखर. या मखरांची माहिती सर्वसामान्यांना व्हावी या उद्देशाने उत्सवी संस्थेने विशेष प्रदर्शनाचे आयोजन केलेले आहे.

उत्सवी संस्थेच्या मखरांची वैशिष्ट्ये :

उत्सवी.नेट संस्थेचे मखर पर्यावरणपूरक आहेत. पर्यावरणपूरकते सोबतच थर्माकोलच्या तुलनेत हे मखर अधिक सुबक व सुरक्षित आहेत. माखरांचा वापर झाला की फोल्ड करून फाईलप्रमाणे ठेऊ शकतो. यासाठी तुमच्या घरातील मोठी जागा किंवा पर्यावरणाची हानी सुद्धा होत नाही. १ ऑगस्ट २०१९ ते २ सप्टेंबर २०१९ रोजी लालबाग येथील गणेश गल्लीमध्ये पर्यावरणपूरक उत्सवी.नेट चे मखर प्रदर्शन भरले आहे. या प्रदर्शनाचे वेळ सकाळी १०.०० ते रात्री १०.०० यावेळीस होणार आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही www.utsavi.net या संकेतस्थळाला भेट देऊ शकता.