सन ई चौघडे,वळू आणि राष्टीय पुरस्कार प्राप्त ,समिता, या तीन यशस्वी मराठी चित्रपटांच्या निर्मितीनंतर शोमँन सुभाष घई त्यांच्या मुक्ता आर्टस लि. तर्फे विजेता या नव्या मराठी चित्रपटाची निर्मिती करणार आहेत.

नुकताचं या चित्रपटाचा थाटामाटात मुहूर्त करण्यात आला. मुहूर्ताचा क्लँप सुभाष घई यांनी दिला.व या चित्रपटाच्या सर्व कलावंत आणि टिमला शुभेच्छा दिल्या.खेळाची पार्श्वभूमी असलेला हा चित्रपट पोस्टरवरूनच प्रेक्षकांची उत्सुकता वाढविणारा आहे.हे लक्षांत येत.गोवा चित्रपट महोत्सवामध्ये या चित्रपटाचे पोस्टर लाँचिंग करण्यात आले होते.पुढील वर्षी २४ जानेवारी २०२० रोजी हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा विचार आहे.

या चित्रपटाचे लेखक,दिग्दर्शक अमोल शेटगे आहेत.निर्माते राहुल पुरी ,सहनिर्माते सुरेश पै ,छायालेखक उदयसिंह मोहिते संगीत रोहन रोहन आणि संकलक आशिष म्हात्रे आहेत.

या चित्रपटात मोठमोठे नामांकित कलावंत काम करत आहेत. सुबोध भावे,पुजा सावंत,सुशांत शेलार, माधव देवचके , मानसी कुलकर्णी, देवेन्द्र चौगुले, तन्वी किशोर,क्रुतिका तुलसकर, प्रीतम कानगे,दिप्ती धोत्रे, गौरीश शिपुरकर,ललित सावंत हे कलावंतही काम करत आहेत