Chendrapur Accident News : एखाद्या स्त्रीच्या नशिबी केव्हा दुःखाची लाट येईल याचा काही नेम नाही. कधी नवरा गेल्याचे दुःख, तर कधी मुलं बाळ सोडून गेल्याचं दुःख यातून बाहेर पडतो ना पडतो आर्थिक चणचण पाचवीला पुजलेली असतेच. स्त्रीच आयुष्य कधीच सोप्प असू शकत नाही, अनेक अडचणी, दुःख हे तिच्या राशीला पुजलेले असतातच. अशाच एका स्त्रीवर बायको आणि आई म्हणून ओढावलेलं दुःख ऐकताच पायाखालची जमीन सरकली. हो. अगदी पंधरा दिवसापूर्वी अर्धांगिनी म्हणून तिचा प्रवास अर्ध्यावरच संपला. आणि या दुःखातून सावरता सावरता आई ही हाक पुन्हा कधीच कानी पडनार नाही ही घटना घडली आणि क्षणार्धात होत्याच नव्हतं झालं. आभाळाएवढ्या कोसळल्या त्या दुःखातून ती महिला बाहेर पडू शकेल की नाही, हा प्रश्न कायम आहे.
ज्याच्याबरोबर सात जन्माच्या गाठी बांधल्या त्याने पंधरा दिवसापूर्वीच जग सोडले. आणि या दुःखातून डोकं वर काढताच नियतीने आणखी एक घाला घातला. ज्या मुलाला तळ हाताच्या फोडासारखं जपलं त्याचा दुर्दैवी मृत्यू अक्षरशः त्या आईच्या डोळ्यासमोर झाला. आपल्याच लेकाचा मृत्यू डोळ्यासमोर पाहायची वाईट वेळ एका आईवर का बरं आली असावी?. पाण्याची बाटली घेऊन आईकडे निघालेल्या चिमुकल्याला कारने धडक दिली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. अंश लांजेकर असे मृत पावलेल्या चिमुकल्याचे नाव आहे.याबाबतची सविस्तर माहिती ‘महाराष्ट्र टाइम्स’ या वृत्तवाहिनेने दिली आहे.
आणखी वाचा – महाराष्ट्रात करोना रुग्णांची संख्या वाढली, नवा आजार आणखी धोकादायक, लक्षणं काय?
सिंदेवाही तालुक्यात येणाऱ्या पळसगाव जाट येथील साईनाथ लांजेकर यांचे पुण्यात पंधरा दिवसांपूर्वी निधन झाले होते. अंतिमसंस्कार करण्यास ते मूळ गावी पोहोचले. तेराव्याचा विधी झाल्यानंतर दुःखातून डोकं वर काढत त्यांची पत्नी लेकाला घेऊन पुण्याकडे पुन्हा रवाना झाली. पुण्याला जाण्यासाठी पळसगाव जाट येथील बसस्थानकावर असताना मुलगा अंश पाण्याची बाटली आणण्यासाठी म्हणून रस्ता ओलांडून दुकानात गेला. पाण्याची बाटली घेऊन तो परत आईकडे येत असताना कारने त्याला धडक दिली.
आणखी वाचा – अक्षय कुमारने परेश रावल यांना पाठवली २५ कोटींची नोटीस, ‘हेरा फेरी ३’मध्येच सोडल्याने वाद पेटला
नवऱ्याच्या दुःखातून सावरण्यासाठी लेकरांचा आधार घेणाऱ्या आईचा मोठा आधार हरपला. ज्याच्याकडे पाहून जगणायची उमेद होती त्या लहानग्याचाच डोळ्यासमोर मृत्यू झाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या त्या लेकराला वाचवण्यासाठी तात्काळ इस्पितळात धाव घेतली मात्र, इस्पितळात उपचार घेण्यापूर्वीच तो मृत पावल्याचे डॉक्टरांकडून समोर आले.