भारताचे माजी पंतप्रधान व अर्थतज्ञ डॉ. मनमोहन सिंह यांचे काल वयाच्या वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले आहे. प्रकृती बिघडल्याने त्यांना दिल्ली येथील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. डॉ. मनमोहन यांच्या निधनाने संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे. त्यांच्या निधनाची माहिती दिल्ली एम्स रुग्णालयाने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. हे प्रसिद्धी पत्रक सोशल मीडियावरही व्हायरल झाले आहे. रात्री आठ वाजताच्या सुमारास त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरु असताना रात्री ९ वाजून ५१ मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने मनोरंजन विश्वातील कलाकारांनादेखील धक्का बसला आहे. (bollywood celebrities on dr. manmohan singh death)
डॉ. मनमोहन सिंह यांना सर्वच क्षेत्रातून मान्यवर व दिग्गजांकडून श्रद्धांजली वाहिली जात आहे. मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकारांनी डॉ. मनमोहन यांच्या निधनाचा शोक व्यक्त केला आहे. अभिनेता रितेश देशमुख, सनी देओल, निमरत कौर,रवी किशन यांनी सोशल मीडियाच्या माध्यामातून श्रद्धांजली वाहिही आहे. रितेशने वडील विलासराव देशमुख व मनमोहन सिंह हात मिळवतानाचा फोटो शेअर केला आहे. तसेच त्याने लिहिले की, “आज आपण भारतातील सर्वात उत्तम अशा प्रधानमंत्र्याना गमावलं आहे,त्यांनी भरतातील आर्थिक विकासाला गती दिली. ते खूप विनम्र होते. त्यांच्या आत्म्यास शांती मिळो”.
Today we have lost one of India’s finest Prime Ministers. The man who propelled India’s economic growth. He epitomised dignity and humility. We will forever be indebted to his legacy. May his soul rest in eternal glory. Thank you Shri Manmohan Singh ji 🙏🏽 pic.twitter.com/dLWMyk5STc
— Riteish Deshmukh (@Riteishd) December 26, 2024
तसेच अभिनेता सनी देओलने श्रद्धांजली देत लिहिले की, “डॉ. मनमोहन सिंह यांच्या जण्याने खूप दु:ख झाले. ते एक दुरदृष्टी बाळगणारे व्यक्ती होते. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये त्यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांची बुद्धिमत्ता, चिकाटी यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये खूप वाढ झाली आहे. मी दु:खामध्ये सहभागी आहे”.त्याचप्रमाणे रवी किशन यांनी लिहिले की, “भारताचे माजी पंतप्रधान श्री. मनमोहन सिंह यांच्या निधनाची दु:खद बातमी समजली. श्री प्रभू रामचरणी प्रार्थना आहे की त्यांच्या आत्म्यास शांती मिळो”.
I’m deeply saddened by the passing of Dr. Manmohan Singh, a visionary leader who played a pivotal role in shaping India’s economic liberalization. His wisdom, integrity& contributions to the nation’s growth will always be remembered. My heartfelt condolences. #RIPDrManmohanSingh pic.twitter.com/Y5lybTCmTv
— Sunny Deol (@iamsunnydeol) December 26, 2024
दरम्यान मनमोहन सिंह यांच्यावर उद्या शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र याबद्दलची अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. त्यांचे पार्थिव दिल्लीतील मोतीलाल मार्ग येथील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या निधना नंतर देशात सात दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. या काळात देशातील सरकारी कार्यक्रम रद्द केले जणार असून राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवला जाणार आहे.