रविवार, जून 1, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi घेणार एक मोठा निर्णय, महत्त्वाची घोषणा करताच सदस्यांच्या चेहऱ्यावरचा रंग उडणार, नेमकं काय झालं?

Saurabh Moreby Saurabh More
सप्टेंबर 23, 2024 | 10:13 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 will make an important announcement all contestants are shocked new promo viral on social media

Bigg Boss Marathi 5 मध्ये होणार एक महत्त्वाची घोषणा, नेमकं झालं तरी काय? नवीन प्रोमो व्हायरल

Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’चा खेळ हा अनेक ट्विस्टचा खेळ आहे. क्षणार्धात या खेळात अनेक वळण येतात आणि होत्याचं नव्हतं होतं. असंच काहीसं शनिवारच्या भागात झालेलं पाहायला मिळाले. बिग बॉस मराठीमध्ये अरबाज पटेल हा चांगला स्पर्धक प्रेक्षकांच्या कमी मतांमुळे बाहेर पडला. घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेत निक्की, अरबाज, जान्हवी, वर्षा आणि सूरज या पाच सदस्यांचा समावेश होता. त्यामुळे या पाच सदस्यांपैकी घरातून बाहेर कोण जाणार? याविषयीच्या अनेक चर्चा रंगलेल्या पाहायला मिळाल्या. सोशल मीडियावर वर्षा उसगांवकर या घराबाहेर जातील अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांकडून व्यक्त करण्यात आल्या होत्या. (Bigg Boss Marathi 5 New Promo)

अशातच नवीन प्रोमोमधून निक्की व अरबाज हे दोघे डेंजर झोनमध्ये असल्याचे सांगण्यात आलं होतं. त्यामुळे या दोघांमध्ये अखेरची लढत पाहायला मिळाली. अरबाज या आठवड्यात कॅप्टन असल्यामुळे सेफ असेल असा अंदाज चाहत्यांनी लावला होता, मात्र हा अंदाज चुकीचा ठरत अरबाजचा ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील प्रवास रविवारी संपला. प्रेक्षकांनी दिलेल्या कमी मतांमुळे अरबाजचा या घरातील प्रवास संपला असल्याचे ‘बिग बॉस’ने म्हटलं. त्यामुळे अरबाज बाहेर जात असल्याचे ऐकताच निक्की ढसाधसा रडू लागली.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

आणखी वाचा – धक्कादायक! अरबाज पटेल Bigg Boss Marathi च्या घराबाहेर, निक्कीचे रडून रडून हाल, असं का घडलं?

अरबाज पटेलच्या नॉमिनेशनच्या या धक्क्यानंतर आता ‘बिग बॉस’ने स्पर्धकांना आणखी एक धक्का दिला आहे. तो म्हणजे बिग बॉस एक मोठा निर्णय घेणार आहेत. कलर्स वाहिनीने नुकताच एक प्रोमो शेअर केला आहे, ज्यात ‘बिग बॉस’ असं म्हणतात की, ‘हा सीझन ब्लॉकबस्टर ठरला आहे”. त्यानंतर घरातील सर्व सदस्य भाऊचा धक्काच्या गाण्यावर बेभान होऊन नाचू लागतात. मात्र यानंतर ‘बिग बॉस’ म्हणतात की, “आता मला एक महत्त्वाची घोषणा करायची आहे. या नंतर बेभान होऊन नाचणारे स्पर्धक शांतच होतात.

आणखी वाचा – महाराष्ट्राचे ‘भूषण’ आता छोटा पडदा गाजवणार! अशोक सराफ यांची नवीन मालिका, भूमिका आहे फारच खास

‘बिग बॉस’च्या या महत्त्वाच्या निर्णयानंतर स्पर्धकांच्या चेहऱ्यावरचा रंगच उडतो. त्यामुळे आता ‘बिग बॉस’ने घेतलेला हा निर्णय नेमका काय असेल? ज्यामुळे स्पर्धकांच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला आहे, हे आजच्या भागात प्रेक्षकांना पाहायला मिळाणार आहे.  दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’चा रविवारचा भाग चांगलाच गाजला. या भागात ‘नवरा माझा नवसाचा २’च्या निमित्ताने सुप्रिया पिळगांवकर, स्वप्नील जोशी व महानायक अशोक सराफ यांनी हजेरी लावली होती.       

Tags: bigg boss marathi 5Bigg Boss Marathi 5 New PromoBigg Boss Marathi 5 News
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Ashok Saraf
Entertainment

पायलट भाचीचे अशोक सराफांना विशेष कौतुक, पद्मश्री पुरस्कारानंतरच्या विमानप्रवासात सांभाळली फ्लाईटची धुरा, म्हणाले, “तिने माझ्यासाठी भांडून…”

जून 1, 2025 | 10:00 am
Deepali Sayed On Vaishnavi Hagawane
Entertainment

“अरे ती गेली…”, वैष्णवीच्या अफेअरच्या चर्चांवर सुप्रसिद्ध अभिनेत्री भडकली, आई-वडिलांनाही केला सवाल, म्हणाली, “जर तुम्ही…”

मे 31, 2025 | 5:30 pm
Farah Khan Big Statement
Entertainment

“‘शीला की जवानी’ आतापर्यंतचे सर्वात स्वस्त गाणे”, स्वतःच्याच गाण्याला फराह खान ठेवतेय नाव, म्हणाली, “अश्लील…”

मे 31, 2025 | 4:01 pm
Sydney Sweeney To Launch Soap 
Lifestyle

ऐकावं ते नवलंच! स्वतःच्या अंघोळीच्या पाण्याने साबण बनवून विकते प्रसिद्ध अभिनेत्री, किंमत ऐकून सगळ्यांनाच बसला मोठा धक्का

मे 31, 2025 | 2:00 pm
Next Post
surekha kudachi on Bigg Boss Marathi 5

Bigg Boss Marathi : "निक्की जायला हवी होती", सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच वक्तव्य, म्हणाली, "तिच्या नादाला लागून तो…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.