झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका म्हणजे ‘अप्पी आमची कलेक्टर’. ही मालिका गेले काही दिवस प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत असून या मालिकेत आता एक नवा अध्याय सुरु होत आहे. मालिका आता सात वर्षांची लीप घेत आहे. त्यामुळे अप्पी व अर्जुन दोघेही सात वर्षे आपल्या जीवनात वेगवेगळ्या वाटेवर जगत असताना आता नियती परत त्यांना समोर आणणार आहे.
अप्पी-अर्जुनच्या आयुष्यात या बदलीमुळे मोठं वळण आलेलं पाहायला मिळणार आहे. अशातच या मालिकेचा एक नवीन प्रोमो आला असून या प्रोमोने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या प्रोमोमध्ये अर्जुन माऊथऑर्गन वाजवताना दिसत आहे आणि त्याने वाजवलेलं ऑर्गन ऐकून अमोल ते माझं ऑर्गन असल्याचं म्हणत आहे. नुकताच शेअर करण्यात आलेला हा प्रोमो सध्या प्रेक्षकांचे चांगलेच लक्ष वेधून घेत आहे.
अप्पी व अमोल एका हॉटेलमध्ये बसलेले असताना आईस्क्रीम खात असतात. तेवढ्यात तिथे अर्जुन येतो आणि तो त्याच्या मैत्रिणीच्या सांगण्यावरून बॅगेतील माऊथऑर्गन वाजवतो. त्याचे माऊथऑर्गन ऐकून अमोल जागेवरुन उठून जातो, तेवढ्यात अर्जुन गेलेला असतो आणि अमोल ते माऊथऑर्गन माझेच असल्याचा हट्ट अप्पीकडे करतो. तर अप्पी ही त्याला ते माऊथऑर्गन उत्तराखंडमध्ये हरवले असून तुझे नसल्याचे त्याला सांगते. मात्र अमोल तरीही त्याच्याकडे त्या माऊथऑर्गनसाठी हट्ट करतो.
दरम्यान, मालिकेने नुकतीच सात वर्षांची लीप घेतली असून अप्पी, अर्जुन व अमोल हे तिघेही आपापल्या आयुष्याच्या वेगळ्या वळणावर पोहोचले आहेत. त्यामुळे आता अमोलची ही हरवलेली वस्तु अप्पी, अर्जुन व अमोल यांना एकत्र आणेल का? अप्पी, अर्जुन व अमोल या तिघांच्या नात्यातला दुरावा संपेल का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. त्यामुळे ‘अप्पी आमची कलेक्टर’ मालिकेचे प्रेक्षक आगामी भागांची आतुरतेने वाट पाहत आहेत.