सध्या बॉलिवूडमध्ये सर्वत्र चर्चा सुरु आहे ती म्हणजे अनंत अंबानी व राधिका मर्चंटच्या लग्नाची. अंबानी कुटुंबात सध्या लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळत आहे. १२ जुलैला अनंत अंबानी राधिका मर्चंट हिच्याशी लग्नगाठ बांधणार आहे. त्यामुळे लग्नाआधीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली असल्याचं पाहायला मिळत आहे. काल ५ जुलैला अनंत-राधिकाचा मोठ्या थाटामाटात संगीत सोहळा पार पडला. मुंबईतील नीता मुकेश अंबानी कन्व्हेन्शनल सेंटरमध्ये हा सोहळा दणक्यात झाला. यावेळी बॉलिवूडसह अनेक दिग्गज यावेळी उपस्थित होते. (Riteish Deshmukh Behaviour)
अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या संगीत सोहळ्याला अभिनेता सलमान खान, माधुरी दीक्षित, रणबीर कपूर, आलिया भट्ट, शाहिद कपूर, कियारा अडवाणी, सिद्धार्थ मल्होत्रा, वरुण धवन, दिशा पटानी, पूजा हेडगे, रितेश देशमुख, जिनिलीया देशमुख असे अनेक बॉलीवूडचे कलाकार उपस्थित राहिले होते. तसंच इतर क्षेत्रातील दिग्गज मंडळींनीदेखील अनंत-राधिकाच्या संगीत सोहळ्याला खास हजेरी लावली होती.
अंबानी यांच्या संगीत सोहळ्यातील एका व्हिडीओची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरु असलेली पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये रितेश देशमुख त्याची बायको जेनेलिया देशमुखसह उपस्थित होता. पापाराझींना त्यांनी एकत्र पोज देत फोटोही दिले. त्याचवेळी माधुरी दीक्षितची तिचे पती डॉ. श्रीराम नेने यांच्यासह एण्ट्री झाली. माधुरी व नेने यांना पाहून रितेशने केलेल्या कृतीचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे.
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये रितेशने माधुरी व डॉ. नेने यांची एण्ट्री होताच त्यांना वाकून नमस्कार केला. तर जेनेलिया व माधुरीने एकमेकांना हात दाखवत हाय केलं. रितेशने खाली वाकून हात जोडून नमस्कार केल्याने त्याच्या संस्कारांचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे. याआधी ही बरेचदा देशमुख कुटुंबाच्या संस्कारांचं कौतुक झालं आहे. मग ते मुलांचे संस्कार असो वा जेनेलियाचे संसार असो, त्यांचे नेहमीच कौतुक केले जाते.