अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्नाला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. या शाही लग्नसोहळ्यामध्ये बॉलिवूडसह साऊथ सिनेसृष्टीतील अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींनीही सहभाग घेतला होता. अनंत व राधिकाला आशीर्वाद देण्यासाठी बच्चन कुटुंबही तिथे आले होते. या काळात संपूर्ण बच्चन कुटुंब पारंपरिक पेहरावात दिसले. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये अमिताभ, जया अभिषेक यांच्यासह बिग बींची मुलगी श्वेता आणि त्यांचा जावईही दिसत होता. अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा आणि त्यांचा नातू अगस्त्य नंदाही दिसत आहेत. मात्र ऐश्वर्या राय बच्चन कुटुंबासह दिसली नाही. वा तिने बच्चन कुटुंबाबरोबर एंट्रीही घेतली नाही. (Anant Ambani-Radhika Merchant Marriage)
ऐश्वर्या राय बच्चन कुटुंबासह कुठेच दिसली नाही. तिने पती अभिषेक बच्चनसह पोजही दिली नाही किंवा बच्चन कुटुंबातील इतर सदस्यासह ती बोलतानाही दिसली नाही. ऐश्वर्याने तिची लेक आराध्यासह पापाराझींसाठी पोज दिली. यावेळी ऐश्वर्या लाल रंगाच्या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत होती. या विवाहसोहळ्यासाठी एंट्री घेतल्यानंतर ऐश्वर्या राय बच्चन पहिल्यांदा ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांना भेटली. यानंतर तिने आराध्यासह पापाराझीसाठी पोज दिली. बच्चन कुटुंबाशिवाय ऐश्वर्याला पाहिल्यानंतर नेटकरी वेगवेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया देत आहेत.
ऐश्वर्याला बच्चन कुटुंबाबरोबर एकत्र न पाहिल्यानंतर नेटकरीही काळजी व्यक्त करत आहेत. सोशल मीडियावर तर नेटकऱ्यांनी विविध प्रकारचे प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे. एका यूजरने लिहिले आहे की, “ऐश्वर्या व तिची मुलगी कुठे आहे? हे चांगले नाही”. तर दुसऱ्या यूजरने लिहिले की, “त्यांनी ऐश्वर्या व आराध्याला वेगळे केले आहे”. ऐश्वर्याशिवाय कुटुंब अपूर्ण आहे”, अशा कमेंट करत ऐश्वर्यासह बच्चन कुटुंब एकत्रित पाहायला मिळावं अशी इच्छा व्यक्त केली आहे.
१२ जुलै रोजी अनंत व राधिका यांनी सात फेरे घेतले. त्यानंतर आज म्हणजेच १३ जुलै रोजी शुभ आशीर्वाद सोहळा संपन्न होणार आहे. या वेळी नवविवाहित जोडपे ज्येष्ठांचे आशीर्वाद घेतील. यानंतर १४ जुलै रोजी वर्ल्ड जिओ सेंटरमध्ये भव्य रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले आहे. भारताबरोबरच जगातील अनेक लोकप्रिय व्यक्ती यात सहभागी होणार आहेत. आशीर्वाद सोहळा व स्वागत समारंभ या दोन्हींसाठी वेगवेगळे ड्रेस कोड निश्चित करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे मुकेश अंबानी यांनी त्यांचा मुलगा अनंतच्या लग्नावर जवळपास २५०० कोटी रुपये खर्च केले आहेत.