सध्या सर्वत्र सिनेविश्वात मुकेश अंबानी यांच्या धाकट्या लेकाच्या लग्नाची चर्चा सुरु असलेली पाहायला मिळत आहे. अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्नाची धामधून सर्वत्र सुरु आहे. अनंत व राधिका मर्चंट येत्या १२ जुलै रोजी लग्नबंधनात अडकणार आहेत. दोघांच्या लग्नापूर्वी त्यांच्या लग्नापूर्वीचे सर्व विधी थाटामाटात पार पाडले जात आहेत. या जोडप्याचा हळदी समारंभ नुकताच म्हणजे ८ जुलै रोजी अगदी थाटामाटात पार पडला. यावेळी सिनेविश्वातील अनेक कलाकार मंडळींनीही हजेरी लावलेली पाहायला मिळाली. हळदी समारंभातील अनेक सेलिब्रिटींचे फोटोही समोर आले आहेत. (Anant Ambani And Radhika Merchant Haldi Look)
दरम्यान, फॅशन डिझाइनर रिया कपूरने राधिका मर्चंटच्या हळदीचा लूक चाहत्यांबरोबर शेअर केला आहे. रिया कपूरने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर राधिका मर्चंटच्या हळदी लूकचे फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये अनंतची बायको पिवळ्या रंगाच्या लेहेंग्यात पाहायला मिळत आहे. या हळदी समारंभातील राधिकाचा लूकही साऱ्यांच्या पसंतीस पडला. तिने पिवळ्या रंगाचा फ्लोरल लेहेंगा परिधान केला होता.
राधिकाने तिच्या लेहेंग्याबरोबर फ्लॉवर डिझाइनसह मोत्याची ओढणीदेखील घेतली होती. याने तिच्या लूकला अधिक शोभा आली होती. हळदी समारंभासाठी राधिकाने सोन्याचे किंवा हिऱ्याचे नव्हे तर मोत्यांचे दागिने परिधान केले होते. आणि हे दागिनेदेखील फुलांच्या डिझाइनसह तयार करण्यात आले होते. रिया कपूरने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये राधिका मर्चंट वेगवेगळ्या पोझ देताना दिसली. यावेळी लग्नाचा आनंद तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट पाहायला मिळाला.
काही फोटोंमध्ये राधिका मर्चंटने गुलाबी रंगाचा सुंदर असं भरतकाम केलेला लेहेंगा परिधान केला आहे. तिने हा लूक डायमंड सेटसह पूर्ण केला. राधिका मर्चंट आता अंबानी कुटुंबाची सून होणार आहे. चाहतेही त्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत.