Ambulance Driver Responsible Women Death : अर्धांगवायूचा झटका आणि मेंदूच्या गंभीर गुंतागुंतीमुळे ४५ वर्षीय महिलेने रुग्णालय गाठलं. रुग्णालयात उपचार होतील या आशेने ती स्वतः आणि तिचे कुटुंबीय अपेक्षेनं पाहत होते. पण याचे उपचार कल्याण-डोंबिवीतील रुक्मिणीबाई रुग्णालयात होणे शक्य नव्हते म्हणून तात्काळ कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात शासकीय रग्णालयात नेण्यास सांगितले. पण यावेळी कमी पडली ती माणुसकी. एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात नेण्यासाठी पैसे तर कमी पडले पण माणुसकीही कमी पडली. आणि यापुढे जे काही घडलं ते माणसातल्या माणूसकीलाही काळीमा फासणारं होतं. १००० रुपये हाती नसल्याने त्या महिलेला रुग्णालयाच्या दारातच आपला जीव सोडावा लागला. ऐकूनच अंगावर काटे आले.
कल्याण पूर्व येथे रहाणाऱ्या ४५ वर्षीय मोलमजुरी करणाऱ्या सुनीता बिराजदार यांच्याबरोबर ही घटना मिळाली. वेळीच उपचार मिळण्याऐवजी रुग्णवाहिका न मिळाल्याने त्यांना रुग्णालयाच्या दारातच आपला जीव गमवावा लागला. सुनीता या घरातील कर्त्या महिला होत्या. त्यांच्या पश्चात त्यांची दोन मुले आहेत. आणि आता त्यांच्या मृत्यूने त्यांची दोन्ही मुलं अनाथ झाली आहेत. सुनीता यांच्या मृत्यूला नेमकं कोण जबाबदार हा प्रश्न आता साऱ्यांनाच सतावत आहे.
आणखी वाचा – “भारत माता की जय”, ‘ऑपरेशन सिंदूर’वर कलाकारांच्या प्रतिक्रिया, म्हणाले, “घरात घुसून मारणार…”
कल्याण-डोंबिवली परिसरात अशा प्रकारे मृत्यू होण्याची ही पहिलीच वेळ नाही. सलग तीन महिन्यात ही तिसरी घटना आहे. डॉक्टर अनुपलब्ध, व्यवस्थेची उदासीनता या कारणांमुळे गरिबांच्या जीवाची ना किंमत ना वाली आहे असं म्हणणं चुकीचं ठरणारच नाही. पाच तास रुग्णवाहिकेसाठी वाट पाहणाऱ्या कुटुंबीयांना शेवटी मृत्यूच प्राप्त झाला. रुग्णवाहिका तेव्हाच सुरु होईल जेव्हा चार रुग्ण जमतील आणि मग त्यांना एकत्र नेलं जाईल, वैयक्तिक रुग्णवाहिका हवी असेल तर अधिक पैशांची मागणी झाली, हे योग्य की अयोग्य?. ही आरोग्य यंत्रणा नव्हे, ही मृत्यूयंत्रणा आहे.
आणखी वाचा – पहलगाम हल्ल्यात आपला माणूस गमावलेल्या ‘ती’चा आवाज, Operation Sindoor नंतर डोळ्यांत पाणी
“पैसे नाहीत? मग तडफडा आणि मरा”, असा संदेश या सगळ्या व्यवस्थेतून मिळतोय. आता आईच्या मृत्यूनंतर त्या निष्पाप मुलांचे भविष्य काय असणार याचा कोण विचार करणार?, काही तरी बदला, वेळीच पावलं उचला, नाहीतर उद्या कुणाचा जीव गमावला जाईल याची खात्री नाही.