Sharmistha Raut Blessed With Baby Girl : सिनेसृष्टीतील अशी बरीच कलाकार मंडळी आहेत जी नेहमीच त्यांच्या आनंदाचे क्षण सोशल मीडियाद्वारे चाहत्यांसह शेअर करताना दिसतात. बरेचदा नवीन घर घेतल्याची बातमी, गाडी घेतल्याची बातमी, आई-बाबा झाल्याची बातमी कलाकार मंडळी चाहत्यांना देतात. अशातच आता एका मराठमोळ्या अभिनेत्री आणि निर्माती शर्मिष्ठा राऊत हिने इंस्टाग्राम स्टोरीवर तिच्यासह नवर्याच्या हातात लेकीचा पाय घेऊन काढलेला फोटो शेअर करत मुलगी झाली असल्याची गुडन्यूज दिली आहे. त्याखाली रुंजी असं नावही तिनं घोषित केलं आहे. शर्मिष्ठाच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांच्या आणि कलाकार मंडळींच्या शुभेच्छांचा वर्षाव होताना पाहायला मिळत आहे.
तसेच, शर्मिष्ठाच्या इंस्टाग्राम स्टोरीवर ही त्यांच्या लेकीच्या थाटामाटात साजरा केलेल्या बारशाचे फोटो व्हायरल होताना दिसतात. यावेळी अभिनेत्री आणि तिचा पती तेजस देसाईने मराठमोळा लूक परिधान केलेला दिसला. शर्मिष्ठाने पांढरा आणि लाल रंगाची नऊवारी साडी नेसली होती तर तेजसने बायकोला मॅचिंग अशा रंगाचा कुर्ता त्यावर पैठणीचा लाल रंगाचा जॅकेट परिधान केलं होतं. दोघही या मराठमोळ्या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत होते. मात्र दोघांनी त्यांच्या मुलीचा चेहरा गुलदस्त्यात ठेवला आहे.
आणखी वाचा – १० मिनिटांपेक्षा अधिक वेळ टॉयलेट सीटवर बसणं योग्य आहे का?, तुम्हीही तेच करत असाल तर…
शर्मिष्ठाच्या मुलीच्या बारशाला अनेक कलाकार मंडळींनी हजेरी लावली असल्याचे पाहायला मिळालं. सोशल मीडियावर तिच्या इंस्टाग्राम स्टोरीबरोबर कलाकार मंडळींबरोबरचे फोटोही बरेच व्हायरल होताना दिसत आहेत. यामध्ये संग्राम साळवी, खुशबू तावडे, हर्षदा खानविलकर, कविता लाड, शिवानी रांगोळे यांसारखी अनेक कलाकार मंडळी पाहायला मिळाली.
आणखी वाचा – ‘तारक मेहता…’मधील भिडेला फक्त ४२ हजार मिळतात?, गोकुळधाम सोसायटीमध्ये कोणाची कमाई अधिक?, श्रीमंत कोण?
ऑक्टोबर २०२० मध्ये शर्मिष्ठाने लॉकडाऊन दरम्यानच तेजस देसाईसह लग्नगाठ बांधली आणि आता लग्नाच्या साडेचार वर्षानंतर शर्मिष्ठा व तेजस आई-बाबा झाले आहेत. सध्या दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव होतानाही पाहायला मिळत आहे. शर्मिष्ठाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, सध्या तिच्या ‘नवरी मिळे हिटलरला’ आणि ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या निर्मिती केलेल्या मालिका चांगल्याच गाजत आहेत.