Paaru Serial New Promo : ‘पारू’ या मालिकेत खूप मोठा ट्विस्ट आलेला पाहायला मिळत आहे. मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, आदित्यचा खूप मोठा अपघात झालेला आहे. त्यामुळे किर्लोस्कर कुटुंबासमोर खूप मोठं संकट आलं आहे. मालिकेत पारूने तिच्या गळ्यातील मंगळसूत्र काढून ठेवल्यानंतर आदित्यच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो हे आधीपासून माहित असतानाही पारूने सगळे संबंध तोडून टाकण्यासाठी गळ्यातील मंगळसूत्र कायमच काढून टाकलेलं असतं. पारू ज्या क्षणाला मंगळसूत्र काढते तेव्हाचं आदित्यचा मोठा अपघात होतो. अपघातानंतर उपचारासाठी आदित्यला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येतं.
आदित्यच्या डोक्याला जखम झाली असल्याने त्याच्या जीवाला धोका असतो असं डॉक्टर कुटूंबियांना सांगतात, वरवर अहिल्यादेवी किर्लोस्कर खंबीर असल्याचं दाखवत असल्या तरी त्या मुळात आतून तुटल्या आहेत. अशा परिस्थितीत त्या कुटुंबाला धीर देताना दिसत आहेत. अशातच आता मालिकेचा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये पारू आदित्यच्या जीवावरील धोका टळण्यासाठी व्रत करताना दिसत आहे.
प्रोमोमध्ये असं पाहायला मिळत आहे की, आदित्यचा जीव वाचवण्यासाठी पारू गळ्यात पुन्हा मंगळसूत्र घालायला जाते. तेव्हढ्यात तिथे एक पुजारी येतात आणि पारूला मंगळसूत्र घालवण्यापासून थांबवतात. आणि म्हणतात, तुझ्या या धाग्याचं पावित्र्य भंगलं आहे. तयार राहा या यातना भोगायला. ही फक्त कुंकवाची परीक्षा नाही आहे तर ही नाळेचीही परीक्षा आहे. तिला पण संघर्ष करावा लागेल. एक कठोर व्रत करायला लागेल. करशील?” असं विचारतात.
आणखी वाचा – Paaru Serial : पारूची प्रार्थना आदित्यला वाचवणार का?, अपघाताचं संकट अखेर टळणार का?, नक्की काय घडणार?
तर पारू हे कठीण व्रत करायला सज्ज होते. सावित्री पारूला कुंकवाचं भस्म लावते. आणि तिच्या कपाळावर हंडाभर पाणी ओतते. तर इकडे अहिल्या देवींनी मंगळसूत्रासह सगळे दागिने काढून ठेवले आहेत. अहिल्यादेवी व पारू ही कठोर परीक्षा पास होणार का?, आदित्यचा जीव वाचवण्यासाठी पारूची ही लढाई उपयोगी येईल का?, तर अहिल्यादेवीही लेकासाठी वाटेल ते करायला तयार आहेत हे सारं आदित्यचा जीव वाचवू शकतील का?, हे पाहणं मालिकेत रंजक ठरेल.