पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणावरुन सध्या राज्यात खळबळ माजली आहे. सर्वत्र हे प्रकरण चर्चेत आलं असून वैष्णवीची हत्या की आत्महत्या याचा शोध सुरु आहे. हुंड्याच्या अतिरिक्त मागणीने सासरच्या मंडळींकडून झालेली मारहाण, शारिरीक व मानसिक त्रास याला कंटाळून वैष्णवीने आत्महत्या पर्याय निवडला. दरम्यान, तिचे आरोपी सासू-सासरे, पती, दीर, नणंद यांना अटक करण्यात आली आहे. वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचे सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे सात दिवस फरार होते. मात्र, पोलिसांना सापळा रचून त्यांना पकडण्यात यश आले. वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिच्या जावेने मयुरी जगतापनेही हगवणे कुटुंबावर आरोपांचा पाढा वाचला. वैष्णवीच्या मृत्यू प्रकरणात मयुरीच्या वक्तव्याने वजन आले. (Mayuri jagtap on vaishnavi hagawane)
वैष्णवीने जीवन संपवल्यानंतर हगवणे यांची मोठी सून मयुरी जगतापनेही मोठे खुलासे केले. आहेत. मयुरीलाही हगवणे कुटुंबियांकडून मारहाण व छळ झाला असल्याचं समोर आलं आहे. तिने स्वतः संपूर्ण प्रकार उघड केला. दरम्यान, मयुरीने केलेल्या एका वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. वैष्णवीच्या मृत्यूनंतर हगवणेंची मोठी सून मयुरी जगतापने पहिल्यांदाच माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना मयुरी म्हणाली की, “मी माझ्या नवऱ्यामुळे वाचली आहे. नवऱ्याच्या पाठिंब्यामुळे मी या सासरच्या छळातून वाचले. यांत माझ्या नवऱ्याने मला साथ दिली”.
आणखी वाचा – काठी-रॉडने मारहाण, कानाचा पडदाही फाटला अन्…; वैष्णवीनंतर सोलापूरात संतापजनक प्रकार, महाराष्ट्र हादरला
मयुरीचा नवरा सुशील हगवणेवरुन आता सवाल उपस्थित केले जात आहेत. वैष्णवी प्रकरणात सुशीलही तितकाच जबाबदार असल्याचं समोर आलं. आणि याच भीतीने सुशील हगवणे वैष्णवीच्या मृत्यूनंतर तब्बल सात दिवस फरार होता. आरोपीचे चित्र स्पष्ट असतानाही मयुरी सुशील हगवणेला पाठीशी घालत असल्याचं दिसत आहे. आरोपी सुशील हगवणेची पाठराखण का केली, असा सवाल आता मयुरीने दिलेल्या प्रतिक्रियेनंतर उपस्थित केला जात आहे.
आणखी वाचा – सासू-सासरे, नणंद, दीराने मारत कपडे फाडले, कोणत्याही थराला जाऊन…; हगवणेंच्या मोठ्या सूनेचे धक्कादायक आरोप
माझ्या नवऱ्याला विनाकारण यांत ओढलं जात आहे अशी प्रतिक्रिया मयुरी हगवणे हिने दिली आहे. मयुरी म्हणाली, “माझ्या नवऱ्याला विनाकारण गोवलं जात आहे. पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. ज्यांनी ज्यांनी वैष्णवीला त्रास दिला त्या सगळ्यांना जन्मठेपेची शिक्षा व्हावी. माझ्या पतींनी आधीच फरार न होता समोर येऊन सांगायला हवं होत म्हणजे त्यांना अटक केलं गेलं नसतं आणि मुख्य सूत्रधार समोर आले असते. मी गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांच्यावर कारवाई झाली असती तर वैष्णवीबरोबर असं घडलं नसतं”, अशी प्रतिक्रिया तिने दिली आहे”. वैष्णवी प्रकरणात मयुरीच्या नवऱ्याची चूक नव्हती मग तो फरार का झाला हा प्रश्न कायम आहे.