भारतात हुंडाबंदी असतानाही हुंड्यामुळे होणारी गळचेपी काही संपलेली नाही. याच ताज उदाहरण म्हणजे वैष्णवी हगवणे. पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण चर्चेत असून याने सर्वत्र खळबळ माजवली आहे. राजकीय क्षेत्रातही याचे पडसाद उमटले असून देशभरात या प्रकरणावर संतापाची लाट उसळली आहे. हुंड्याच्या अतिरिक्त मागणीने सासरच्या मंडळींकडून झालेली मारहाण, शारिरीक व मानसिक त्रास याला त्रासून वैष्णवीने गळफास घेत आत्महत्येचं मोठं पाऊल उचललं. यानंतर आता पुन्हा एकदा असंच एक प्रकरण समोर आलं आहे. एका विवाहित स्त्रीला हुंड्यामुळे मारहाण सहन करावी लागली आहे. सध्या ही स्त्री रुग्णालयात उपचार घेत आहे. (dowry case in Solapur)
पुण्यातील हुंडाबळीच्या प्रकरणानंतर आता सोलापुरातील आणखी एक हुंडा प्रकरण समोर आलं आहे. सोलापुर जिल्ह्यातील टेंभुर्णी गावातील चित्रा सतीश भोसले हिला हुंडा प्रकरणावरुन बेदम मारहाण सहन करावी लागली. विवाहीत महिलेला दीर आणि जाऊ यांच्याकडून बेदम मारहाण करण्यात आली आहे. या घटनेत महिला गंभीर जखमी झाली असून, गेल्या दहा दिवसांपासून तिच्यावर सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
आणखी वाचा – आई-बापाच्या विरोधात लग्न करण्याची हिच शिक्षा का?, वैष्णवीने बाळाचाही विचार न करता…
सोलापूरच्या टेंभुर्णीमधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चित्रा सतीश भोसले यांना त्यांचे दीर संतोष भोसले, निलेश भोसले आणि जावा निलीता संतोष भोसले व पूजा निलेश भोसले या चौघांनी मिळून काठी व रॉडने बेदम मारहाण केली. ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर चित्रा भोसले यांना त्यांनी विष पाजण्याचा देखील प्रयत्न केला. या घटनेत त्या गंभीर जखमी झाल्या असून, त्यांच्या शरीरावर अनेक ठिकाणी मारहाणीच्या खुणा आहेत. या मारहाणीमध्ये त्यांच्या कानाचा पडदा देखील फाटल्याचा आरोप महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे.
आणखी वाचा – ताप नियंत्रणात तरी शस्त्रक्रिया लांबणीवर; दीपिका कक्करची तब्येत आता कशी?, नवरा शोएब म्हणाला, “आता तिला…”
समोर आलेल्या माहितीनुसार चित्रा भोसले यांचा विवाह २००७ साली सतीश भोसले यांच्याशी साली झाला होता. लग्नानंतर हुंड्यासाठी चित्रा यांना त्रास सहन करावा लागला. नंतर २०१४ साली कुटुंबीयांविरोधात 498 कलमांतर्गत गुन्हा देखील दाखल करण्यात आला. मात्र दोन वर्षानंतर भोसले कुटुंबीयांनी चित्रा भोसले यांना नांदवण्याची लेखी हमी दिल्यानंतर त्या आपल्या सासरी गेल्या. आणि काही दिवसांत पुन्हा एकदा चित्रा यांना हुंडा प्रकरणावरुन त्रास सहन करावा लागला.