Armaan Malik Wife Pregnancy : युट्युबर अरमान मलिक त्याच्या व्लॉगसाठी ओळखला जातो. या व्यतिरिक्त, तो काही हरियाणवी संगीत व्हिडीओमध्येही दिसला आहे. दोन बायकांबरोबर राहणाऱ्या अरमान यांना बर्याचदा सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागतो, परंतु त्याच्या चाहत्यांची संख्याही काही कमी नाही. त्यांच्या व्हिडीओवर अनेक चाहते नेहमीची लाईक्सचा वर्षाव करताना पाहायला मिळतात. आता नुकत्याच झालेल्या व्लॉगमध्ये, कृतिका मलिकने गर्भवती असल्याची माहिती दिली आहे. पाचव्यांदा अरमान मलिक वडील होणार असल्याचे समोर आले आहे. प्रसिद्ध युट्युबर अरमान मलिक ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये दोन्ही पत्नीसमवेत लोकप्रिय रिऍलिटी शोमध्ये दिसला.
‘बिग बॉस’मुळे अरमान मलिकला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. या शोमध्ये त्याने चाहत्यांची मनं जिंकली. परंतु त्याची लोकप्रियता नक्कीच वाढली आहे. रिऍलिटी शो दरम्यान त्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. दरम्यान, YouTuber आता त्याच्या दुसर्या पत्नीच्या गर्भधारणेबद्दल चर्चेत आला आहे. जे अरमानचे अनुसरण करतात त्यांना हे माहित आहे की प्रत्येक व्हिडीओमध्ये त्याच्या काही ना काही ट्विस्ट हा असतोच. यावेळी त्याचा संपूर्ण व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
अरमान मलिक वडील होणार?
अरमान मलिकला कॉमेडी, गमतीशीर व्हिडीओ बनवण्यासाठी देखील ओळखले जाते. नवीनतम व्हिडीओमध्ये, त्याने दुसरी पत्नी कृतिका मलिक यांच्यासह व्हिडीओ बनविला, जो एक गमतीशीर व्हिडीओ आहे. यामध्ये, अरमानच्या सांगण्यावरुन, कृतिकाने कॅमेरासमोर गर्भधारणा चाचणी बाबत सांगितलं, जी सकारात्मक झाली. तथापि, हे खरे नाही कारण तो आपल्या पहिल्या पत्नीला भडकवण्यासाठी आणि फसवण्यासाठी गंमत करत होता.
आणखी वाचा – “एका मुलीचा बाप म्हणून…”, वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणावर मराठी अभिनेत्याचा संताप, म्हणाला, “गप्प बसून…”
व्लॉग पाहिल्यानंतर हे स्पष्ट झाले की अरमान मलिकची पत्नी कृतिका गर्भवती नाही, परंतु तिने आपल्या पतीबरोबर गंमत केली. कृतिकाने व्हिडीओमध्ये गर्भधारणा किट दाखविली. सुरुवातीला व्लॉगमध्ये पाहिल्यानंतर, चाहत्यांना आश्चर्य वाटले, परंतु व्हिडीओच्या शेवटी हे सत्य नसल्याची माहिती समोर आली. अरमान मलिकची पहिली पत्नी पायल मलिकला एक मुलगा चिरायु आहे. त्याच वेळी, जेव्हा कृतिका मलिक गर्भवती झाली, तेव्हा पायलने एका मुलीला जन्म दिला. त्याची दुसरी पत्नी कृतिका मलिक हिला जुळी मुलं आहेत. तिने एक मुलगा आणि मुलीला एकत्र जन्म दिला. एकंदरीत, अरमान हा चार मुलांचा वडील आहे.