Anushka sharma Post : भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली सध्या चर्चेत आहे. विराट कोहलने अलीकडेच कसोटी क्रिकेटमधून सेवानिवृत्तीची घोषणा केली आहे. त्याच्या या निर्णयाने जगभरात हवा केली आहे. क्रिकेटपटूकडून विराट कोहलीच्या कसोटी क्रिकेटमधून सेवानिवृत्तीच्या घोषणेमुळे चाहते खूष नाहीत. १४ वर्ष कसोटी क्रिकेट खेळल्यानंतर विराटने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. विराटच्या या निर्णयानंतर अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. मात्र विराटने हा निर्णय नेमका का घेतला याचे उत्तर अद्याप अस्पष्ट आहे. यादरम्यान विराटची पत्नी अनुष्का शर्मा त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी असलेली दिसली. पतीच्या सेवानिवृत्तीच्या घोषणेनंतर अनुष्काने पोस्ट शेअर करत विराटला पाठिंबा दर्शविला.
विराटची पत्नी अनुष्का शर्मा या प्रकरणावरुन यावर सतत पोस्ट शेअर करत आहे. अशातच विराटची स्तुती करणारी एक पोस्ट अनुष्काने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केली आहे. अनुष्का शर्माने इंस्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट शेअर करत असं म्हटलं आहे की, “म्हणूनच कसोटी क्रिकेटमध्ये तेच यशस्वी झाले, ज्याच्याकडे सांगायला काहीतरी कथा होती. ओल्या, कोरड्या, देशी, परदेशी प्रत्येक पिचवर लिहूनही ही गोष्ट काही संपणारी नाही”. अनुष्काने या पोस्टसह एक पांढरा हार्ट इमोजी शेअर केला आहे.

मंगळवारी अनुष्का शर्मा आणि विराट कोहली प्रेमानंद महाराज यांच्या आश्रमामध्ये पोहोचले. अनुष्का आणि विराट यांनी प्रेमानंद महाराजांना प्रार्थना केली. प्रेमानंद महाराजांनी विराट आणि अनुष्काला विचारले होते की, “प्रसन्न आहेस का?”. यावर विराटने उत्तर दिलं की, “ठिक आहे”. त्यानंतर प्रेमानंद महाराजांनी आध्यात्मिक दृष्ट्या विराटला समजावलं. त्याच वेळी, प्रेमानंद महाराजांचे शब्द ऐकून अनुष्का शर्मा भावुक झालेली दिसली. अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल आहे.
आणखी वाचा – मुलगी झाली, बायको बाळंतपणातच गेली अन्…; तरीही सीमेवर भारतीय सैनिकाचा लढा, संसार उघड्यावर असूनही…
अनुष्का शर्माच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, ती शेवटची ‘झिरो’ या चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट २०१८ मध्ये प्रदर्शित झाला होता. अनुष्का शर्माशिवाय या चित्रपटात शाहरुख खान आणि कतरिना कैफ हे कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसले. झिरो चित्रपटानंतर अनुष्काने कला या चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली. २०१८ पासून ती कोणत्याही मुख्य भूमिकेत दिसली नाही. अनुष्का ‘चकदा एक्सप्रेस’ हा चित्रपटही अद्याप प्रदर्शित झालेला नाहो. हा चित्रपट प्रदर्शित होईल की नाही याबद्दल कोणतेही अपडेट समोर आलेले नाही. अलीकडे असे म्हटले जात होते की हा चित्रपट कोल्ड स्टोरेजमध्ये जाण्याची दाट शक्यता आहे.