Soldier Wife Passed Away : भारताने पाकिस्तान विरोधात आखलेल्या ऑपरेशन मोहीमची जगभरात चर्चा झाली. भारत-पाकिस्तान यांच्यातील हा वाद सध्या चर्चेत आहे. पहलगाम हल्ल्यात पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी केलेला हल्ला २६ निष्पाप लोकांच्या जीवावर बेतला आणि याचा बदला म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूर ही मोहीम आखली. भारत- पाकिस्तानमधील या युद्धात भारतीय सैनिकांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. सीमारेषेवर असणाऱ्या या सैनिकांच्या सुट्ट्या रद्द करत त्यांना कामावर परत रुजू व्हावे लागले. यावेळी देशसेवेसाठी कोणतीही तक्रार न करता हे जवान बांधव पुन्हा कामावर परतले. काहींचे दोन दिवसापूर्वी लग्न झाले होते, तर काही एक वर्षाच्या बाळाला घराकडे सोडून कर्तव्य बजावण्यात पुढे आले.
अनेक जवान सुट्टीवरुन थेट सीमेवर देशाच्या रक्षणासाठी पोहोचले. मात्र ओडिशाच्या संबलपूर येथील एका जवानाच्या कुटुंबाची हृदयद्रावक घटना समोर आली. जवान देबराजच्या पत्नीचं उपचारावेळी निधन झाले. पत्नीचं आजारपण आणि लेकीचा जन्म या दोन्ही गोष्टी एकाच वेळी समोर आल्या असताना देबराज यांना कामावर परतावे लागले. देबराज हे सशस्त्र सीमा दलात कार्यरत आहेत. आजारी पत्नी आणि नवजात मुलीचा निरोप घेत देबराज सीमेवर देशाच्या रक्षणासाठी तैनात झाला आहे.
२८ एप्रिलला भारतीय जवान देबराज यांच्या पत्नी लिपी यांनी मुलीला जन्म दिला मात्र तिला मातृत्वाचा आनंद घेता आला नाही. अर्थात हा आनंद काही क्षणापुरता टिकला. मुलीच्या जन्मानंतर काही तासांतच तिच्या आईची तब्येत खालावत गेली. लिपीची प्रकृती पाहता तिला डॉक्टरांनी बुर्ला मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल येथे नेले. ती आयसीयूत उपचार घेत होती. यावेळी लीपी बेशुद्ध अवस्थेत होती. तिच्या शरीरातील अनेक अवयवांनी काम करणे बंद केले होते. आणि १३ मे रोजी देबराज यांच्या पत्नीने उपचारावेळी अखेरचा श्वास घेतला.
आणखी वाचा – सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री झाली आई, लग्नाच्या सहा वर्षांनी दिली गुडन्यूज, घरी चिमुकल्याचं आगमन
नुकत्याच जन्मलेल्या त्या चिमुकल्या जिवाने आईचा साधा चेहराही पाहिला नाही. यांत त्या चिमुरडीचा काय दोष?, यांत त्या मृत पावलेल्या आईच्या तरी काय दोष?, आणि देशसेवेला गेलेल्या त्या जवानाचा तरी काय दोष?. लिपीच्या निधनाने आणि त्या चिमुकल्या जिवावर ओढवलेल्या संकटाने साऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आलं. वडील सीमेवर आणि आईचा मृत्यू या घटनेने त्या निरागस नवजात जिवाचा आधार कोण झालं असेल?, त्या जवानावर बायकोच्या निधनाचे दुःख, लेक एकटी असल्याचं टेन्शन याच किती दडपण आले असावे याचा विचारही करवत नाही.