Govinda Wife Sunita Ahuja Statement : गोविंदा आणि त्याची पत्नी सुनिता आहुजा या त्यांच्या वैयक्तिक कारणामुळे चर्चेत असतात. काही दिवसांपासून दोघे वेगळे होत घटस्फोट घेणार असल्याच्या अफवा सतत कानावर येत होत्या. मात्र, सुनीता यांनी हे विधान खोडून काढत आम्ही दोघांना कोण वेगळे करु शकत त्याने एकदा समोर यावे असं म्हटलं. आणि त्यांच्या विभक्त होण्याच्या अफवांचा अंत झाला. त्यांचे वकील ललित बिंदल यांनी पुष्टी केली आहे की, सुनिताने काही महिन्यांपूर्वी घटस्फोटासाठी अर्ज केला होता, परंतु ते म्हणाले की, तेव्हापासून या समस्यांचे निराकरण झाले आहे. त्यांनी आश्वासन दिले की हे जोडपे एकमेकांसह खूप आनंदी आहे आणि ते वेगळे होणार नाहीत.
सुनिता आहुजा यांनी अलीकडेच ट्रोलिंगबद्दल जोरदार प्रतिसाद दिला आहे. ‘एबीपी न्यूज’ला दिलेल्या मुलाखतीत सुनीता आहुजा ट्रोलिंगबद्दल उघडपणे बोलली आणि घटस्फोटाच्या अफवांवर तिची भूमिका साफ केली. ती म्हणाली की, लोक नकारात्मकतेने बोलले असले तरी त्यांनी ते सकारात्मक मार्गाने घेणे सुरु केले आहे. सतत अनुमान लावणाऱ्या लोकांचा संदर्भ घेताना ती म्हणाली, “सकारात्मक किंवा नकारात्मक यावर सारं काही अवलंबून आहे. जर तुम्ही सकारात्मक असाल तर मला माहित आहे. मला असे वाटते की लोक कुत्रे लोक भुंकणारच”. ती म्हणाली की, जोपर्यंत कोणी तिचे किंवा गोविंदाचे याबाबत स्पष्टीकरण थेट ऐकत नाही तोपर्यंत त्यांच्या नात्याबद्दल येणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये”.
सुनिताने पुढे म्हणाली की, सुंदर पती आणि दोन सुंदर मुले आहेत हा तिला आशीर्वाद वाटतो. ती म्हणाली, “जोपर्यंत तुम्ही माझे किंवा गोविंदाचे म्हणणे ऐकत नाही तोपर्यंत आमच्या नात्याचं काय याचा विचार करु नका. गॉसिपचा माझ्यावर परिणाम होत नाही”. तिचा मुलगा यशवर्धन आहुजा यांचा आगामी बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याबद्दल बोलताना, सुनीताने शेअर केले की, तिने नेहमीच त्याला आपली ओळख निर्माण करण्यास प्रवृत्त केले आहे आणि त्याच्या वडिलांच्या सावलीत न राहता त्याने स्वतःच स्थान निर्माण केलं आहे.
‘ढिशूम’, ‘बागी और किक २’ सारख्या चित्रपटांमध्ये यशने यापूर्वीच सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. सुनीताने असेही सांगितले की तिची मुलगी टीना इतर कामांमध्ये व्यस्त आहे आणि उद्योगात स्वत: चा मार्ग बनवित आहे.