मनोरंजन विश्वात अनेक विषयांवर मालिका, चित्रपट, नाटक यांची निर्मिती केली जाते. या सर्वांमध्ये प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळालेला विनोदी कार्यक्रम म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’. बऱ्याच कालावधीपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत असलेला तर्क मेहता का उल्टा चष्मा हा कार्यक्रम सध्या चर्चेत आहेत ते कार्यक्रमातील काही कलाकारांनी निर्मात्यांवर केलेल्या आरोपांमुळे. कार्यक्रमातील तारक मेहता ही मुख्य भूमिका साकारणारे अभिनेते शैलेश लोढा यांनी या कार्यक्रमातून निरोप घेतल्या नंतर अनेक कलाकारांनी या कार्यक्रमातील निर्मात्यांवर गंभीर आरोप केले. या कार्यक्रमातील अभिनेत्री जेनिफर मिस्त्री बन्सीवाल या अभिनेत्रीने या आधी निर्मात्यांवर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. सिंगापूर मध्ये शूट करत असताना निर्मात्यांनी गैरवर्तवणूक करत छळ केल्याचा आरोप देखील यापूर्वी जेनिफर ने केला होता. (jennifer mistry bansiwal controversy)
तारक मेहता का उल्टा चष्मा कार्यक्रमावर पुन्हा एकदा टीका(jennifer mistry tmkoc)

आता पुन्हा एकदा जेनिफरने तारक मेहता का उल्टा चष्मा या कार्यक्रमाच्या प्रोडक्शन टीम बाबत खळबळजनक खुलासा केला आहे. जेनिफर या वेळी म्हणाली “आम्ही सेटवर असताना अक्षरशः अन्न, वस्त्र या सारख्या गोष्टींसाठी सेटवर आम्हाला प्रोडक्शनकडे भीक मागावी लागत होती. कित्येकदा आम्ही स्वतः आमचे कपडे धुतो कारण २०-२० दिवस आमचे कपडे देखील धुतले जात न्हवते. सेटवर पाण्याच्या बॉटल्स देखील मर्यादित मागवल्या जायच्या आणि अतिरिक्त पाणी मागितल्यावर आमचं कोणी ऐकून घेणार न्हवत. तसेच भूक लागल्यावर जेवण मागितलं असता आम्हाला बिस्कीट दिलं जायचं”.
हे देखील वाचा – बिगबॉसचा आवाज असणारे अतुल – विजय प्रत्येक सिझनला घेतात तब्बल ‘इतकं’ मानधन
जेनिफरने केलेले ही आरोप सध्या सगळीकडे व्हायरल होताना दिसतायत. या आरोपांमध्ये आणखी भर घालत जेनिफर पुढे म्हणाली ” सेटवर बऱ्याचदा सूज, चप्पल आम्ही स्वतःच्या वापरयचो तसेच सेटवरील लहान मुलांना देखील कॉस्ट्यूम दिलं जात न्हवत. जेनिफर प्रमाणेच अन्य कलाकारांनी देखील प्रोडक्शन टीम आणि निर्मात्यांवर अनेक आरोप केले होते.(tarak mehta ka ulta chasma)