....तर दीपिका पदुकोण माझी चौथी पत्नी असती : संजय दत्त
संजय दत्त व्यावसायिक आयुष्यापेक्षा खासगी आयुष्यामुळे तो अधिक चर्चेत राहिला आहे
संजय आतापर्यंत तीन वेळा लग्नबंधनात अडकला आहे
१९८७ साली तो ऋचा शर्माबरोबर लग्नबंधनात अडकला
मात्र ब्रेन ट्यूमरमुळे १९९६ साली तिचे निधन झाले
त्यानंतर १९९८ साली त्याने रिया पिल्लयीबरोबर लग्न केले मात्र २००८ साली ते वेगळे झाले
त्यानंतर त्याने मान्यता दत्तबरोबर लग्न केले
‘चोली के पिछे’ या गाण्यासाठी माधुरी व्यतिरिक्त कोणाला बघायला आवडलं असतं? असं विचारलं
त्यावर त्याने दीपिकाचे नाव घेतले, तो म्हणाला की, “ती खूप सुंदर आहे”.
नंतर तो म्हणाला की, “मी थोडा लहान असतो तर दीपिकाबरोबर चौथे लग्न केले असते”.