आता काही दिवस आपण सगळे घरीच आहोत, बरयाच कलाकारांनी आपल्याला सांगितलं आहेच कि वेळेचा सदुपयोग करा काहीतरी नवीन शिका,तुमचे छंद जोपासा,आणि आम्हाला  खात्री आहे कि तुम्ही नक्की काहीतरी नवीन करत असाल आणि म्हणुन आम्ही  तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत अश्या काही मराठी वेबसिरीज आहेत ज्या तुम्ही ह्या वेळेत बघू शकता आणि यामुळे नक्कीच तुमचे मनोरंजन होईल.. 

१.समांतर (MX Player)

स्वप्नील जोशीची मुख्य भूमिका असलेल्या 'समांतर' या वेब सिरीजला अवघ्या ३ दिवसात मिळाली ८० लाखांहून अधिक प्रेक्षकांची पसंती, सतीश राजवाडे दिग्दर्शित ‘समांतर’ ही आजपर्यंतच्या मराठी वेबसीरिजच्या इतिहासातील सर्वाधिक पाहिलेली वेब सिरीज बनली, समांतर’ची निर्मिती ‘जीसिम्स’ या कंपनीने केली असून ‘एमएक्स प्लेयर’च्या वेब सिरीज सेगमेंटमध्ये उपलब्ध आहे तसेच ‘समांतर’ या वेब मालिकेला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद पाहायला मिळत असून प्रेक्षकांना या वेबमालिकेतील स्वप्नील जोशी, तेजस्विनी पंडित आणि इतर कलाकारांची देखील कामे आवडत आहेत. कुमार महाजनचे भविष्य सुदर्शन चक्रपाणी या माणसाशी कसे जोडले गेले आहे आणि आपले भविष्य जाणून घेण्यासाठी कुमार महाजन चक्रपाणी पर्यंत कसा आणि कोणकोणत्या संकटाना समोर जात त्याचा शोध घेतो हा सगळा प्रवास पाहणे प्रेक्षकांसाठी अतिशय रंजक ठरत असून ही वेबमालिका “एमएक्स प्लेयर” या अग्रगण्य ओटीटी मंचावर उपलब्ध आहे. 


२. काळे धंदे (ZEE 5)

काळे धंदे हा एक फ्रेश आणि नवीन काळातील हास्य दंगल आहे. गोष्टी व्यवस्थित लावण्याच्या बेताने तो आणखी गडबडीत अडकतो. “काळे धंदे ह्या वेबसेरीजच्या  प्रत्येक सीनमध्ये विनोदाची खुसखुशीत पटकथा आहे. हा एक प्रसंगनिष्ठ विनोद आहे ज्यामुळे प्रेक्षकांना नक्कीच मनोरंजन मिळेल. ह्या वेबसिरीज मध्ये आपल्याला शुभंकर तावडे आणि संस्कृती बालगुडे हि फ्रेश जोडी पाहायला मिळेल. 


३. आणि काय हवं.? (MX Player)

सात वर्षांच्या मोठ्या कालावधीनंतर मराठी सिनेसृष्टीतील 'क्युट कपल' अर्थात प्रिया बापट आणि उमेश कामत आता 'आणि काय हवं' या वेबसिरीजच्या माध्यमातून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. ऑफस्क्रिन आणि ऑनस्क्रिनही या दोघांची केमिस्ट्री उत्तमरित्या जुळून येते असल्याचे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे या वेबसिरीजमधूनही ते प्रेक्षकांची मनं नक्कीच जिंकतील. या वेबसिरीजमध्ये प्रिया 'जुई'ची तर उमेश 'साकेत'ची व्यक्तिरेखा साकारत आहे. वैवाहिक जीवनात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला सामोरे जात असतानाच ते दर दिवशी एकमेकांच्या नव्यानं प्रेमात पडत आहेत. ह्या वेबसिरीजचे २ सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. 


४. पांडू (MX Player)

अनुषा नंदा कुमार आणि सारंग साठे दिग्दर्शित 'पांडू' ही वेबसिरीज पोलिसांच्या दैनंदिन आयुष्यावर आधारित आहे. सुहास शिरसाट आणि दीपक शिर्के या दोन धाडसी पोलिसांची ही कथा आहे, जे आपले शहर सुरक्षित राहावे, म्हणून सदैव तत्पर असतात. या वेबसिरीजमध्ये पोलिसांच्या रोजच्या जीवनाचे चित्रण अतिशय रंजक आणि विनोदी पद्धतीने दाखवण्यात आले आहे.
या वेबसिरीजबद्दल दिग्दर्शक सारंग साठे सांगतात, "मुंबई सारख्या मोठ्या शहराचे रक्षण करणे ही साधी गोष्ट नाही. त्यासाठी प्रामाणिकपणे हे व्रत आचरणात आणावे लागते. मुंबईसारख्या शहराचे रक्षण करण्यासाठी धाडसी आणि निडर मन असावे लागते. आपल्या मुंबई पोलिसांमध्ये हे सर्व गुण आहेत. म्हणूनच आपण आपल्या घरात, शहरात सुरक्षित आहोत, याची जाणीव करून देण्यासाठी ही सर्व मंडळी रात्रंदिवस झटत असतात.  ही कथा माझ्या खूप जवळची असण्याचे आणखी एक कारण म्हणजे यात स्त्री आणि पुरुष पोलीस खाकी वर्दी असताना आणि नसताना त्यांचे जीवन कसे असते, याचे दर्शन घडते. सरतेशेवटी पोलीस सुद्धा तुमच्याआमच्या सारखा एक माणूसच आहे. पोलिसांच्या न पाहिलेल्या आयुष्याचा आढावा अतिशय रंजक पद्धतीने या वेबसिरीजच्या माध्यमातून घेण्यात आला आहे. '' 


५. once a year (MX Player)

एमएक्स प्लेयरच्या 'वन्स अ  ईअर' या वेबसिरीजमध्ये प्रेमाला मिळालेले एक अद्भुत वळण पाहायला मिळणार आहे. मंदार कुरुंदकर दिग्दर्शित या वेबसिरीजमध्ये निपुण धर्माधिकारी आणि मृण्मयी गोडबोले यांच्या मुख्य भूमिका असून सहा भागांच्या या वेबसिरीजमध्ये या दोघांच्या प्रेमाचा सहा वर्षांचा प्रवास पाहायला मिळणार आहे. कॉलेजमध्ये होणाऱ्या मैत्रीपासून ते प्रेमाची जाणीव होईपर्यंतचे सर्व अनमोल आणि अविस्मरणीय क्षण यात बघता येतील. या वेबसिरीजबद्दल दिग्दर्शक मंदार कुरुंदकर म्हणतात, "कोणत्याच प्रेमकथेची सुरुवात ही पहिल्याच नजरेत होत नाही. कोणीही पहिल्याच भेटीत आपल्या शाश्वत प्रेमाची कबुली देत नाही. यासाठी काही काळ जावा लागतो. या वेबसिरीजमध्ये एका जोडप्याच्या जीवनात त्यांचे प्रेम प्रत्येक टप्यावर कसे फुलत जाते आणि अधिक मजबूत होते, हे पाहायला मिळेल. निपुण आणि मृण्मयी सोबत काम करताना खरंच खूप मजा आली. त्यांनी त्यांच्या अभिनयाने मला खूप खुश केले."
     या वेबसिरीजमध्ये काम करण्याच्या अनुभवाबद्दल निपुण सांगतो, "माझा प्रेमावर खूप विश्वास आहे. या वेबसिरीजमधून आपल्याला दोन व्यक्तींच्या प्रेमाचा सहा वर्षांचा चढ-उतारांनी भरलेला प्रवास पाहायला मिळणार आहे. त्यांच्या पहिल्या भेटीपासून ते त्यांच्या आवडी निवडी, त्यांच्या सवयी आणि त्यांचे मतभेद सुद्धा यात पाहायला मिळतील. मला विश्वास आहे, की जी जोडपी आता प्रेमात आहेत त्या सर्वांच्या या सोनेरी काळाला नक्कीच ही वेबसिरीज जोडली जाईल."